घरदेश-विदेशहिंसेबाबत कलकत्ता हायकोर्ट कठोर; रिसदा आणि शिवपूरमध्ये केंद्रीय तुकड्या तैनात करण्याचे आदेश

हिंसेबाबत कलकत्ता हायकोर्ट कठोर; रिसदा आणि शिवपूरमध्ये केंद्रीय तुकड्या तैनात करण्याचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमधील हावडा आणि हुगळी जिल्ह्यात निघालेल्या शोभा यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. आता आठवडा होत आला तरी हुगळी जिल्ह्यातील रिसदामध्ये अजूनही शांतता प्रस्थापित झालेली नाही. आज सकाळीसुद्धा रिसदामध्ये हाणामारीची घटना घडली. त्यामुळे उद्या होणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेनिमित्त कलकत्ता हायकोर्टाने मोठा आदेश दिला आहे. (The Calcutta High Court has given a major order on the occasion of Shobha Yatra to be conducted on the day of Hanuman Jayanti).

कलकत्ता हायकोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला केंद्रीय सैन्याची मागणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच उद्या होणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेबाबतही मोठा आदेश दिला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी सुरक्षा व्यवस्था कडेकोट असावी, असे कलकत्ता हायकोर्टाने म्हटले आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, गरज भासल्यास उद्या होणाऱ्या शोभा यात्रेसाठी केंद्रिय फौजफाटा तैनात करण्यात यावा. याशिवाय कलम 144 लागू असलेल्या भागात हनुमान जयंतीच्या दिवशी शोभा यात्रा न काढण्याचे आदेशही कलकत्ता हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारापासून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विरोधी नेते प्रभावित भागात केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी करत होते.

- Advertisement -

दरम्यान रामनवमीच्या दिवशी पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील शिवपूर, हुगळी जिल्ह्यातील रिसदासह अनेक भागात हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी दोन समाजाचे लोक आमनेसामने आल्यामुळे जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांबाबत विरोधी पक्ष भाजपने पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील सरकारवर लांगुलचालनाचा आरोप केला.

गृहमंत्रालयाने हिंसाचाराचा अहवाल मागवला
कलकत्तामध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अहवाल मागवला आहे. बंगालमधील भाजपाचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी हिंसेबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -