घरमुंबईमुंबईकरांसाठी गुड न्यूज! पावसाचा मुंबईकरांना 'हवाहवा'सा फायदा

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! पावसाचा मुंबईकरांना ‘हवाहवा’सा फायदा

Subscribe

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली आहे. जोरदार पाऊस आणि वेगवान वारा यामुळे मुंबईच्या हवेमध्ये सुधारणा झाली आहे.

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा दिला आहे. पण याच पावसाचा मुंबईकरांना ‘हवाहवा’सा वाटणारा फायदा झाला आहे. दोन दिवसाच्या जोरदार पावसामुळे मुंबईतील हवेची गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याची माहिती एअर क्वालिटी इंडेक्सने जाहीर केली आहे. सोमवारी हवेमध्ये असलेली गुणवत्ता ही मंगळवारी देखील कायम राहणार असल्याची माहिती देखील एअर क्वालिटी इंडेक्सने दिली आहे. ० ते ५० या पातळीवर असलेली हवेची गुणवत्ता ही आरोग्यदायी असते. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता पातळी ही ० ते ५०मध्ये आहे. जोरदार पाऊस आणि वेगाने वाहणारे वारे याचा फायदा हा हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झाल्याचे एअर क्वालिटी इंडेक्सने म्हटले आहे. बऱ्याच मोठ्या काळानंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी ही ५०च्या आतमध्ये नोंदवली गेली आहे.
यापूर्वी मागील सोमवारी अर्थात १८ जुन रोजी हवेची गुणवत्ता पातळी ही १८, १२ ऑगस्ट २०१७ रोजी हवेची गुणवत्ता पातळी ही ३२ तर ६ डिसेंबर २०१७ रोजी हवेची गुणवत्ता पातळी ही ४३ नोंदवली गेली होती. केरळमध्ये डिसेंबर-२०१७ रोजी आलेल्या ओखी वादळाचा फायदा हा हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झाला होता.

मुंबईमध्ये जोरदार पाऊस

दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे त्याचा फायदा हा हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी झाला आहे. पावसामुळे लोकल देखील ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. शिवाय, वडाळ्यातील अॅन्टॉप हिल भागात संरक्षक भिंत कोसळली तर पेडर रोड येथे झाड कोसळले. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अॅन्टॉप हिल परिससरातील दुर्घटनेमुळे गाड्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वडाळ्यातील दोस्ती आणि लॉयल इस्टेट बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -