घरदेश-विदेशअपार्टमेंटमधील प्रचाराने उमेदवारांना मानदुखीचा त्रास

अपार्टमेंटमधील प्रचाराने उमेदवारांना मानदुखीचा त्रास

Subscribe

निवडणुका म्हटल्या की जनसंपर्क हा आलाच.त्यामुळे राजकीय पक्ष जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. ऊन असो, पाऊस किंवा वादळात देखील ही नेतेमंडळी मतदारांपर्यंत या ना त्या मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. कधी कधी गल्लीबोळातून जाताना नेत्यांना अपार्टमेंटमधील लोकांना अभिवादन करत मते मागावी लागतात. तर कधी हात उंचावावा लागतो. परंतु,नेत्यांच्या या अशा प्रचारामुळे त्यांना मानदुखीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे गल्लीबोळ आणि अपार्टमेंटची संख्या अधिक असलेल्या दिल्लीत मते मिळवताना दिल्लीतील उमेदवारांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. मते मिळवण्यासाठी कराव्या लागणार्‍या कष्टांमुळे येथील नेत्यांची मान दुखत आहे. अपार्टमेंट किंवा फ्लॅटमधील मतदारांशी संपर्क साधताना मान उंचावून नेताजींना मतदानासाठी अपिल करावे लागते. मान वर करणे जेवढे शक्य होईल तेवढी ते करत असतात. ही प्रक्रिया दिवसभर करावी लागते.तसेच अपार्टमेंटच्या वरील मजल्यावरून जर कोणी हाक दिली तर इच्छा नसताना देखील नेताजींना मान वर करावी लागते. दिल्लीतील पश्चिम विहार, शालीमार बाग, मुखर्जी नगर, सिव्हील लाईन्स, प्रशांत विहार, विकासपुरी, राजा गार्डन, रोहिणी, लक्ष्मी नगर, प्रीत विहार, सोनिया विहार, ग्रीन पार्क, वसंत कुंज, मालवीय नगर, खान मार्केट संरक्षण कॉलनी, साकेत, त्रिलोकपुरी, राजा गार्डन, अशोक पार्क अशा अनेक भागांत अपार्टमेंट्सचा सर्वाधिक समावेश आहे.

- Advertisement -

काहीजण योगा करतात,तर काही डॉक्टर गाठतात

या त्रासाने केवळ एकच नेता नाही,तर बर्‍याच नेताजींना याचा सामना करावा लागत आहे. खास करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा यात समावेश आहे. आपचे नेते राघव चढ्ढा,गुगन सिंग , आतिशी, पंकज गुप्ता तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांना देखील याचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून केजरीवाल सकाळी योगायोग करतात. इतर नेत्यांनी या वेदनांतून मुक्त होण्यासाठी काही व्यवस्था देखील केल्या आहेत. भाजपचे उमेदवार हर्षवर्धन म्हणाले की, सकाळी ते मानेचा व्यायाम करतात. त्याने बराच आराम मिळतो. कधीकधी ते करणे आवश्यक आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांचा समर्थक सांगतो की, नेताजी सकाळी 25 मिनिटे योगा करतात. ‘ मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला भेटण्याला आमचे प्राधान्य असते. काही मतदार अपार्टमेंटमध्ये राहतात, यामुळे ते खाली येऊ शकत नाहीत. आमच्याकडे कमी वेळ असल्याने आम्हा खालूनच त्यांना नमस्कार करतो. वेदना तर होतात,परंतु,आम्हाला आपले मत त्यांना सांगायचे असेल,तर त्यांचे म्हणणे देखील आम्हाला ऐकले पाहिजे,असे आम आदमी पक्षाचे प्रवक्ता आणि दक्षिण दिल्लीमधून आपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राघव चड्डा यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -