घरताज्या घडामोडीधक्कादायक ! चोरट्याने लंपास केले पोतभर carona test kit

धक्कादायक ! चोरट्याने लंपास केले पोतभर carona test kit

Subscribe

जगभरात करोना व्हायरसचे मृत्यूचे तांडव सुरू असताना अनेक देशात रुग्णांची चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले करोना टेस्ट किटच उपलब्ध नसल्याचे त्यांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र याचदरम्यान अमेरिकेतील एका रुग्णालयातून चोरट्याने पोतभरून करोना टेस्ट किट लंपास केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याचा पराक्रम कैद झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

चोरट्याचा फोटो पोलिसांनी सगळीकडे व्हायरल केला असून त्याला शोधण्यात मदत करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. विशेष म्हणजे ही चोरी शुक्रवारी झाली. पण सध्या रुग्णालयात सर्वच व्यस्त असल्याने कोणाच्याही ते लक्षात आले नाही. हा चोरटा सामानाची ने आण करणाऱ्या टेम्पोचा चालक म्हणून रुग्णालयात घुसला. दरम्यान अमेरिकेबरोबरच अनेक देशात करोनाचा कहर बघून काहींनी करोना टेस्ट किट का्ळ्या बाजारात विकण्यास सुरुवात केली आहे. जे बनावट आहे त्यापासून दूर राहण्याचे आवाहन अमेरिकेच्या आरोग्य विभागाने सर्वच देशांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -