घरदेश-विदेश'या' ठिकाणी मांजरी देतात 'पहारा'

‘या’ ठिकाणी मांजरी देतात ‘पहारा’

Subscribe

दैनंदिन जीवनात शेतकऱ्यांपासून ते विविध व्यवसाय करणारे लोक अनेक प्राण्यांची मदत घेत असतात. यापैकी मालमत्तेची सुरक्षा करायची झाल्यास आपल्या डोळ्यासमोर सर्वात पहिला प्राणी येतो तो कुत्रा. माणसाचा वफादार मित्र अशी कुत्र्यांची ओळख आहे. याउलट स्वतःचे लाड पुरवून घेणारी, घाबरट अशी ओळख असणारी मांजर सुरक्षारक्षक असू शकते? असं म्हटलं तर तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे.

मांजरी करतात संग्रहालयाची राखण

रशियातील सेंट पीटर्सबर्ग मधील हेरिमिटेज या वस्तूसंग्रहालयाच्या सुरक्षारक्षक चक्क मांजरी आहेत. एकूण ७० मांजरी या संग्रहालयामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. १७६४ सालापासून ते आजतागायत मांजरींच्या अनेक पिढ्या या जागेची राखण करत आहेत.

- Advertisement -
फोटो सौजन्य- मिडियम.कॉम

‘मांजरीसाठी’ होते पर्यटकांची गर्दी

रशियातील प्राचीन हेरिमिटेज संग्रहालय हे नेहमीच पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. मात्र, लोक संग्रहालयातील पुरातन वस्तूंपेक्षा इथे पहारा देणाऱ्या या अनोख्या मांजरी पाहण्यासाठीच जास्त गर्दी करतात.

…अशी करतात ‘राखण’

इथल्या मांजरीची शिस्त देखील पाहण्यासारखी असते. ज्यावेळी जास्त संख्येने पर्यटक संग्रहालयामध्ये येतात, तेव्हा संग्राहलयात इकडे-तिकडे फिरत असलेल्या मांजरी एकापाठोपाठ रांग लावून तळघरात जातात. मात्र, तळघरातूनही या मांजरी पर्यटकांवर नजर ठेवत असतात. एखाद्या पर्यटकाची हालचाल खटकल्यास त्या सांकेतिक भाषांमध्ये अन्य मांजरीना सिग्नल देतात. त्यानंतर संबंधित मांजर बेल वाजवून सुरक्षा अधिकाऱ्यांना त्याची सूचना देते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम असंच अविरत सुरु आहे.

फोटो सौजन्य – observer
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -