घरदेश-विदेशअद्याप निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका - CBSE

अद्याप निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका – CBSE

Subscribe

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. ११ जुलै आणि १३ जुलैला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचं वृत्त होतं. सीबीएसईने या वृत्ताचं खंडन केलं आहे.

दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेविषयी अशी काही सूचना आल्यास, त्यावर विश्वास ठेवू नका. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल. सध्या सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत येऊ शकेल. ही माहिती सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात आपल्या अधिकृत निवेदनात दिली आहे. परंतु मंडळाकडून कोणतीही विशिष्ट तारीख जाहीर केलेली नाही. त्याचबरोबर सीबीएसईनेही ट्विट करुन ही अधिसूचना नाकारली आहे. अद्याप निकालाची तारीख जाहीर केली नसल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजगृहाजवळील बेस्टचा बस थांबा हलवला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -