घरदेश-विदेशहरयाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर गँगरेप

हरयाणामध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तरुणीवर गँगरेप

Subscribe

महिलांवरील अत्याचार, बलात्कार अशा घटना वारंवार ऐकत असतो. हरियाणामध्ये असाच प्रकार घडला आहे. १९ वर्षिय तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

सीबीएसई बोर्डाची टॉपर आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेती तरुणीवर हरयाणामध्ये गँगरेप झाल्याची घटना घडली आहे. हरयाणाच्या महेंद्रगडच्या कनिनामध्ये ही घटना घडली आहे. १९ वर्षाच्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर गँगरेप करण्यात आला आहे. याप्रकरणी रेवाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवाडी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

गुंगीचे औषध देऊन पीडितेवर गँगरेप

१२ सप्टेंबरला पीडित तरुणी कोचिंग क्लासला निघाली असता कारमधून आलेल्या ५ ते ६ जणांनी तिला क्लासला सोडतो असे सांगत गाडीत बसवले. गाडीमध्ये बसलेले तरुण पीडित तरुणीच्या गावामध्येच राहणारे आहेत. ओळखीचे असल्यामुळे ती गाडीमध्ये बसली. त्यानंतर आरोपींनी तरुणीला निर्मनुष्य जागेवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीला तहान लागल्यामुळे तिला त्यांनी पाणी प्यायला दिले त्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध होते. पाणी प्यायल्यानंतर ती बेशुध्द झाली त्याचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर गॅगरेप केला. त्यानंतर बेशुध्द अवस्थेत तिला एका बसस्टॅडवर सोडून आरोपी फरार झाले, असे पीडित तरुणीने पोलिसांना तक्रारीमध्ये सांगितले आहे.

- Advertisement -

आरोपींविरोधात अद्याप कारवाई नाही

या घटनेनंतर पीडित तरुणीने घरी जाऊन घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबियांना सांगितले. पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबियांनी याप्रकरणी रेवाडी पोलीस ठाण्यामधये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपींनी पीडित तरुणीला कोणाला सांगितले तर जीवे मारेल अशी धमकी दिली होती. पोलीस देखील याप्रकरणात काहीच कारवाई करत नाही. आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस दुसऱ्या पोलीस स्टेशनला जाण्यास सांगत आहे. पीडिच तरुणीचे कुटुंबिय न्यायाची मागणी करत आहेत.

पीडितेला राष्ट्रपतींकडून मिळाला होता पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सांगतात की, बेटी बढाव, बेटी पढाव. पण कसे मुलींना शिकवायचे असा सवाल पीडित तरुणीच्या आईने केला आहे. २०१५ मध्ये पीडित तरुणी सीबीएसईमध्ये हरियाणा राज्यात टॉपर होती. २६ जानेवारी २०१६ रोजी दिल्लीत तिला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले होते. सध्या ती ग्रॅज्युएशन करत आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार यांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -