घरदेश-विदेशराज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; खासदार-मार्शलच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ आला समोर

राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ; खासदार-मार्शलच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ आला समोर

Subscribe

राज्यसभेत गोंधळ सुरु असतानाच मार्शल्सनी महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, राज्यसभेतील या गोंधळाचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये विरोधी खासदार वेलमध्ये येऊन विरोध करत असल्याचं दिसून येत आहे. याचवेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या मार्शल्सनी खासदारांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना धक्काबुक्की होत असल्याचं दिसून येत आहे.

राज्यसभेत विमासंदर्भातील विधेयक जबरदस्तीने मंजूर केलं जात होतं. त्याला विरोध केल्याने बाहेरून मार्शलला बोलावण्यात आलं. त्यांनी खासदारांसोबत धक्काबुक्की केली. तसंच महिला खासदारांनाही निशाणा बनवलं, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यानंतर सरकारने राज्यसभेतील व्हिडिओ तपासला जाील असं सांगितलं होतं. दरम्यान, हे व्हिडिओ समोर आले आहेत. यात मार्शल आणि खासदारांमध्ये धक्काबुक्की होत असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

- Advertisement -

राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळाचे फुटेज समोर आल्यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. ‘सरकार जे सांगतंय त्याला तुम्ही खरं समजत असाल तर ठिक आहे. पण आम्ही सभागृहात बघितलंय. राज्यसभेतील सर्व सदस्यांनी पाहिलंय. फुटेज सोबत काय छेडछाड करता येते हे सर्वांना माहिती आहे. तिथे फोर्स आलीच कशी? एवढे मार्शल्स तिथे नव्हते आणि महिलाही नव्हत्या,’ अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

शरद पवार, राहुल गांधी, खरगेंचा केंद्रावर आरोप

संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही, असं शरद पवार म्हणाले. राज्यसभेती विरोधी पक्षनेता मल्लिकार्जून खरगे यांनी देखील महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की करत अपमान केल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षातील सदस्य विरोध प्रदर्शन करण्यासाठी आसनाजवळ जातात तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेरलं जातं असा देखील आरोप खरगे यांनी केला. हा संसदेचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याची टीका खरगेंनी केली आहे. राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावण्यात आलं आणि खासदारांना मारहाण करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

संसदीय कार्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक खोटं पसरवत आहे.. उलट विरोधी सदस्यांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप जोशी यांनी केला. तसंच सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं जावं अशी सभापतींकडे विनंती केल्याचं सांगितलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -