घरताज्या घडामोडीHelicopter Crash: CDS जनरल बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडही नव्हता, अन् कटकारस्थानही नव्हते,...

Helicopter Crash: CDS जनरल बिपीन रावतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाडही नव्हता, अन् कटकारस्थानही नव्हते, अहवालातील कारण काय ?

Subscribe

हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधलिका आणि हेलिकॉप्टरमधील १४ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु ही दुर्घटना हेलिकॉप्टरमधील तंत्रज्ञान बिघाड किंवा कोणताही कट रचल्यामुळे झालेला नाहीये. तर अचानक झालेल्या ढगांच्या गर्दीमुळे ही दुर्घटना घडली. ट्राय सर्व्हिस चौकशी समितीने अपघाताच्या सखोल तपासाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. वायुसेनेच्या रिपोर्टनुसार, बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना तपास अहवालातील तपशीलांची माहिती दिली आहे.

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या ट्राय सर्व्हिस समितीचे प्रमुख एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांनी संरक्षण मंत्र्यांना हेलिकॉप्टर दुर्घटनेशी संबंधित तपासातील निष्कर्षांचा अहवाल दिला आहे.

- Advertisement -

ट्राय सर्व्हिस चौकशी समितीने सांगितलं की, हेलिकॉप्टरच्या उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झालेला नाहीये. तसेच कोणताही कट किंवा हल्ला करण्यात आलेला नाहीये. हेलिकॉप्टरमध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर अशी साधनं असतात. परंतु यामध्ये वैमानिकांनी कोणतीही चूक केल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये.

बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन येते एका कार्यक्रमासाठी जात होते. परंतु वेलिंगटवरून कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घाटना घडली. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु हेलिकॉप्टर अनेक ढगांच्या गर्दीत गेल्यामुळे ते घनदाट जंगलातील एका खडकावर आदळले आणि इंधनामुळे आग लागली. त्यामुळे रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व १४ जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा : मोदीजी तुम्ही जे पेरले तेच आज उगवले, पंजाबच्या घटनेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -