घरक्रीडाInd vs SA 2nd test : जोहान्सबर्ग कसोटीत रवींचंद्रन अश्विनचा नवा रेकॉर्ड

Ind vs SA 2nd test : जोहान्सबर्ग कसोटीत रवींचंद्रन अश्विनचा नवा रेकॉर्ड

Subscribe

जोहान्सबर्गच्या मैदानात भारताला अतिशय गरजेची कीगन पीटरसनची विकेट मिळवून देत रवीचंद्रन अश्विनने एक नवा इतिहास रचला आहे. अश्विनने आतापर्यंतच्या कारकिर्दीत या मैदानावर १७ विकेट्स मिळवल्या आहेत. भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेनंतर अश्विन हा एकमेव स्पिनर ठरला आहे, ज्याने विक्रमाची बरोबरी केली आहे. जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताच्या २४० धावांचा पाठलाग करायला सुरूवात केली आहे. आज दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने दोन गडी गमावत ११६ धावा केल्या आहेत. त्यामुळेच भारताच्या चौथ्या दिवसाच्या कामगिरीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. भारताला पहिली विकेट शार्दुल ठाकूरने मिळवून दिली. तर दुसरी विकेट ही रवीचंद्रन अश्विनने मिळवून दिली. अतिशय चिवट फलंदाजी करणाऱ्या कीगन पीटरसनला एलबीडब्ल्यू करत अश्विनने हे यश मिळवले. या मैदानात सचिन तेंडुलकर तसेच रवि शास्त्री यांनीही गोलंदाजी केली आहे. तर पाकिस्तानच्या स्पिनर शादाब खानने २०१९ मध्ये या मैदानावर विकेट मिळवली होती.

दक्षिण आफ्रिकेत भारताला एक इतिहास घडवण्याची संधी जोहान्सबर्ग कसोटी सामन्याच्या निमित्ताने चालून आली आहे. भारताने यजमान दक्षिण आफ्रिका संघाला २४० धावांचे लक्ष्य दिले आहे. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने सन्मानपूर्वक लक्ष्य देण्याची किमया केली. या मैदानात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कधीच इतक्या धावसंख्येचा पाठलाग केला नाही. त्यामुळेच भारताच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण दक्षिण आफ्रिकेनेही अतिशय चिवट फलंदाजी केली आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल काहीही लागू शकतो अशी परिस्थिती आहे. सामन्यात अजुन दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे.

- Advertisement -

या मैदानावर आधी ३१० धावांचा स्कोअर ऑस्ट्रेलियाने केला होता. तसेच २००६ मध्येही ऑस्ट्रेलियन संघाने २९४ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका आतापर्यंत २२० धावांचा स्कोअर शेवटच्या इनिंगमध्ये केला आहे. याआधी न्यूझीलंडविरोधात दक्षिण आफ्रिकेने हा विजय मिळवला होता. भारत या मालिकेत १-० अशा आकडेवारीने आघाडीवर आहे. त्यामुळेच भारताला या सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे.

आज भारताचा डाव सावरताना आतापर्यंतची फ्लॉप जोडी ठरलेल्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने चांगली भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला चांगल्या लक्ष्याचे आव्हान दिले. भारताने मॅचमध्ये कमबॅक करत २६६ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. भारताच्या २४० धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट ४७ धावांवर गमावली. त्यापाठोपाठ ९३ धावांवर दुसरे यश हे अश्विनने कीगन पीटरसनच्या निमित्ताने मिळवून दिले. अनिल कुंबळेनंतर रवीचंद्रन अश्विन हा वंडर्सच्या मैदानात विकेट घेणारा स्पिनर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एल्गर आणि पीटरसनने चांगली फलंदाजी केली.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -