घरताज्या घडामोडी१८ दिवसांमध्ये ४० लाख लोकांचे लसीकरण; कोविशील्डच्या १ कोटी डोसची दुसऱ्यांदा मागणी

१८ दिवसांमध्ये ४० लाख लोकांचे लसीकरण; कोविशील्डच्या १ कोटी डोसची दुसऱ्यांदा मागणी

Subscribe

सीरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाकडे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा कोविशील्डच्या दुसऱ्या डोसची मागणी करण्यात आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनावरील कोविशील्ड लस बाजारात उपलब्ध करून दिल्यानंतर केवळ १८ दिवसांमध्ये तब्बल ४० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा कोविशील्डच्या दुसऱ्या डोसची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १ कोटी लसींची मागणी करण्यात आली आहे. तर एप्रिलपर्यंत सीरमला आणखी ४.५ कोटी डोसची ऑर्डर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोविशील्डची किंमत २०० रुपये

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरमनुसार ‘कोविशील्ड’ची भारतात किंमत २०० रुपये आहे. तर जीएसटी लावून ती लस २१० रुपयाला मिळते. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने उचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असा दावा केला आहे की, भारतात गेल्या १८ दिवसात तब्बल ४० लाखांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जगातील देशामध्ये भारतात सर्वात कमी दिवसात अधिक लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता लसीकरण करण्यामध्ये भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

- Advertisement -

एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

विशेष म्हणजे गेल्या २४ तासात लसीकरण झाल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, मणिपूर, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.


हेही वाचा – World Cancer Day 2021: जाणून घ्या का साजरा केला जातो ‘जागतिक कॅन्सर दिवस’

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -