घरक्राइमलखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण अंगलट; केंद्रीय मंत्र्यांच्या मुलासह 14 जणांवर खुनाचा आरोप...

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरण अंगलट; केंद्रीय मंत्र्यांच्या मुलासह 14 जणांवर खुनाचा आरोप निश्चित

Subscribe

लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याच्यासह 14 जणांवर खुनाचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. (Lakhimpur Kheri Violence Case) न्यायालयाने आशिष मिश्रासह 13 आरोपींविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आरोप निश्चित केले आहे. आशिष मिश्रासह इतर आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न यासह अनेक गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. आता 16 डिसेंबरपासून या प्रकरणाची सुनावणी सुरु होणार आहे.

पोलिसांनी आज दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, हिंसाचारातील मरण पावलेल्या शेतकऱ्यांप्रकरणी जिल्हा कारागृहात बंद असलेले केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह सर्व 14 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आला आहे. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनीलकुमार वर्मा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

- Advertisement -

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रासह सर्व 13 आरोपींचा जामीन जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला, त्याचवेळी या 14 आरोपींवर निश्चित आज आरोप निश्चित करण्यात आले.

नेमकी घटना काय?

पंजाबच्या लखीमपूरमधील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या घटनेत चार शेतकऱ्यांसह आट जणांचा मृत्यू झाला. आशिष मिश्रासह त्यांच्या साथीदारांवर शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याचा आरोप करण्यात आला. आरोपी आशिषसह 14 आरोपी सध्या लखीमपूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात हे एकूण 14 आरोपी होते त्यापैकी एक बाहेर आहे.

- Advertisement -

या घटनेप्रकरणी एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले, यात शेतकऱ्यांच्या बाजूने एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 आरोपी आहेत.

न्यायालयाने आशिष मिश्रा यांच्यासह 14 आरोपींवर आयपीसी कलम 147 (दंगल घडवणे), 148- (प्राणघातक शस्त्रांसह हल्ला), 326 (हल्ला करण्यास भाग पाडणं), 307- (खुनी हल्ला), 302-(खून) असे आरोप ठेवले आहेत. आरोपी सुमित जैस्वाल याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम 3/25 (परवाना नसताना शस्त्र बाळगणं), आरोपी मंत्री पुत्र आशिष मिश्रा, अंकित दास, लतीफ उर्फ काळे यांच्याविरुद्ध आर्म्स अॅक्टचं कलम 30 (शस्त्र परवान्याच्या अटींचं उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शरद पवारांवर 48 तासात बेळगावला जाण्याची वेळ येणार नाही; फडणवीसांचे आश्वासन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -