घरदेश-विदेशचिनी कोरोना वॅक्सीनमुळे लोकांना होऊ शकतो गंभीर आजार - तज्ज्ञ

चिनी कोरोना वॅक्सीनमुळे लोकांना होऊ शकतो गंभीर आजार – तज्ज्ञ

Subscribe

चीनमध्ये चार औषध कंपन्या कोरोना लसीवर काम करत आहेत. सिनोव्हॅक (Sinovac) या कंपनीच्या कोरोना लस पॅकेटवर स्पष्टपणे सांगितले की, त्याला चीनच्या नॅशनल मेडिकल प्रोडक्ट्स अॅडमिनिस्ट्रेशनकडून मान्यता मिळाली नाही. मात्र The Epoch Times ने दिलेल्या वृत्तानुसार, चिन मधील एका सरकारी कंपनीने काही कर्मचार्‍यांना सक्तीने ही लस घ्यायला सांगितले आहे.

आजतकने दिलेल्या माहितीनुसार, theepochtimes.com ला TravelSky Technology नावाच्या कंपनीचे अंतर्गत कागदपत्र प्राप्त झाले आहे ज्यावरून असे उघड झाले आहे की कंपनीने आपल्या काही कर्मचार्‍यांना सक्तीने कोरोना लसीच्या चाचणीत भाग घेण्यास सांगितले आहे. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही लस सरकारी संस्थांकडून मंजूर झालेली नाही आणि या लसीचा प्रयोग माणसांवर करण्यात आला तर तो धोकादायक ठरू शकतो.

- Advertisement -

अहवालानुसार, १५ जूनच्या कागदपत्रात असलेल्या माहितीतून असे दिसून आले की, कंपनीने सात गटातील आपल्या कर्मचार्‍यांना कोरोनाव्हॅक लसीच्या चाचणीत भाग घेण्यास सांगितले आहे. डिसेंबर २०१९ च्या आकडेवारीनुसार कंपनीकडे एकूण ७ हजार ४७६ कर्मचारी आहेत. दरम्यान ही लस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे, असा दावाही कंपनीने या कागदपत्रात केला आहे.

अमेरिकन सोसायटी ऑफ टॉक्सिकॉलॉजीचे सदस्य आणि हांगकांगच्या चिनी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या चान किंग मिंग यांच्या मते- ‘ही लस धोकादायक ठरू शकते. कोरोनासारख्या परिस्थितीत, असेही होऊ शकते की, या लसमुळे लोक संक्रमित होऊ शकतात आणि या लोकांना वुहान मधील लोकांसारखा न्यूमोनिया या आजाराला सामोरे जावे लागेल.

- Advertisement -

चान किंग मिंग असा प्रश्न देखील विचारतात की, जर ही लस मंजूर झाली नाही तर त्याच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार असेल? बीजिंगमध्ये असणारी कंपनी सिनोव्हाक बायोटेकने (Sinovac Biotech) कोरोना व्हॅक (CoronaVac) नावाची कोरोना लस तयार केली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि ब्रिटनमधील लसीच्या चाचण्या दरम्यान जे लोक त्यांच्या जोखमीवर लस देण्यासाठी पुढे येत आहेत त्यांना डोस देण्यात येत आहे.


व्हायरस चीनची पाठ सोडेना! कोरोनानंतर ‘या’ नव्या व्हायरसची एन्ट्री!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -