चीनच्या हेनान प्रांतातील कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी; 36 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

china henan province anyang city factory cought fire 36 killed and many injured

चीनच्या हेनान प्रांतातील एनयांग शहरातील एका कारखान्यात भीषण आगीची घटना समोर आली आहे. या आगीत 36 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी झाले आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी मंगळवारी ही माहिती दिली. या घटनेत दोन जणं बेपत्ता झाले आहे.

वेनफेंग जिल्ह्यातील Caixinda Trading Co Ltd मध्ये ही आग लागली आहे. या घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ज्यात दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले आहेत.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासांच्या मेहनतीने आग विझवली आहे, जवळपास 200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल याच्या मदतकार्यात गुंतले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ही आग लागली. जवळ पास 5 ते 6 तास ही आग विझवण्यासाठी लागले, स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 च्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आली आणि रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे विझवण्याच आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


इंडोनेशिया भूकंपामुळे हादरले, १६२ जणांचा मृत्यू; इमारती कोसळल्या, रुग्णालयात गर्दी