घरठाणेCISCE बारावीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली

CISCE बारावीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली

Subscribe

CISCE (Council for the Indian School Certificate Examinations)ने ISC चा म्हणजेच इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे. या परीक्षेत ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली आली आहे. ठाण्याच्या सिंघानिया शाळेत उपासना नंदी शिकत होती. बोर्डाने CISCE ने त्यांच्या cisce.org, results.cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला आहे.

सीआयएससीई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा ९९.७६ टक्के निकाल लागला असून ९९.५२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९९.२६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

यंदा देशभरातून ९६ हजार ९४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना ९९.७५ टक्के टक्के मिळाले. यामध्ये ठाण्याच्या सिंघानिया शाळेची उपासना हिचाही या १८ विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक लागतो.

निकाल कसा तपासाल?

- Advertisement -

सर्वांत आधी cisce.org वर जा. त्यानंतर होम पेजवर ‘ISC निकाल 2022’ या लिंकवर क्लिक करा. इंडेक्स नंबर, UID आणि कॅप्चा कोड सारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट केल्यानंतर ‘ISC वर्ग 12वी निकाल 2022’ ओपन होईल. ते तपासून तुम्ही डाऊनलोड करू शकता.

दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी

ICSE च्या इयत्ता दहावीचा निकाल १७ जुलै रोजी जाहीर झाला होता. या निकालातही मुलींनी बाजी मारली होती. ९९.९८ टक्के मुली आणि ९९.९७ टक्के मुलं यावेळी पास झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -