घरताज्या घडामोडीPM Modi Vs CM Mamata: पीएम मोदींनी हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर ममता बॅनर्जींना...

PM Modi Vs CM Mamata: पीएम मोदींनी हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर ममता बॅनर्जींना राग अनावर, म्हणाल्या…

Subscribe

कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (CNCI) च्या दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन केले. हे भारतातील १३० कोटी जनतेच्या शक्तीचे प्रतीक असल्याचं मोदींनी सांगितलं. परंतु याचदरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येथील कार्यक्रमात उपस्थित होत्या. मात्र, मोदींनी हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पीएम मोदी ज्या योजनचे उद्घाटन करत आहेत. त्याचे उद्घाटन राज्य सरकारने यापूर्वीच केले आहे. कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या कॅम्पसच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित होणार होते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. मी पंतप्रधानांमुळे कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. कारण पंतप्रधान या योजनेचं उद्घाटन करत आहेत.

- Advertisement -

केंद्र आणि राज्याने मिळून जनहितासाठी काम केलं पाहिजे

कोरोनाच्या विषाणूच्या महामारीत आम्हाला एका कोविड केंद्राची आवश्यकता होती. त्यामुळे मी एकदिवस चित्तरंजन हॉस्पिटलच्या दुसऱ्या राजरहाट परिसराला भेट दिली. तेव्हा आम्ही त्याचे उद्घाटन केले होते. राज्य सरकार ७१ टक्के रक्कम देत आहे आणि कॅम्पस बांधण्यासाठी आम्ही ११ एकर जागाही दिली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याने मिळून जनहितासाठी काम केले पाहिजे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, पीएम मोदींनी आज(शुक्रवार) सांगितलं की, भारताने कोविड-१९ च्या विरूद्ध लढ्यात देशातील सर्वच नागरिकांना १५० कोटींचं लसीकरण करण्यात आलं असून एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे इतर देशांसाठी हे आश्चर्याची बाब आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Ration Card: तुमचं नाव रेशन कार्ड वगळलयं?, नाव शोधण्याच्या सोप्या टिप्स


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -