घरताज्या घडामोडीयोगी आदित्यनाथांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला जाणे अशक्य!

योगी आदित्यनाथांच्या वडिलांचे निधन, लॉकडाऊनमुळे अंत्यसंस्काराला जाणे अशक्य!

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्त यांचे दीर्घ आजारामुळे आज सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना गेल्या महिन्यात दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसात त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. वडिलांच्या निधनाची  बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केलं. तसंच त्यांनी नंतर एक पत्र देखील लिहिलं. या पत्रात त्यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस या महामारीमुळे मंगळवारी वडिलांच्या होणाऱ्या अंत्यसंस्कारला उपस्थित राहणार नाही आहेत. लॉकडाऊनचे पालन करा आणि कमीत कमी लोकांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहा, असं त्यांनी इतरांना आवाहन केलं.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, मला वडिलांचं शेवटं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती. परंतु उत्तर प्रदेशातील २३ कोटी लोकांच्या हिताच्या दृष्टीने जागतिक महामारी विरोधात देशाचा लढा पुढे नेण्याचे माझे कर्तव्य असल्यामुळे मी इच्छा पूर्ण करू शकत नाही. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे पालन करण्याकरिता मी २१ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडिलांनी १९९८ मध्ये उत्तराखंडच्या यमेश्वर भागात उच्च शिक्षणासाठी गुरु गोरखनाथ महाविद्यालय सरू केलं. आनंद सिंह बिष्त यांच्या परिवारात पत्नी, तीन मुले आणि चार मुली आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यपालांवरील टिकेनंतर भाजप नेते आक्रमक; नारायण राणे, आशिष शेलार यांचा राऊतांवर प्रहार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -