घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022 : सहकार क्षेत्रांना आता १५ टक्के कर, सहकार क्षेत्रासाठी मोठी...

Budget 2022 : सहकार क्षेत्रांना आता १५ टक्के कर, सहकार क्षेत्रासाठी मोठी घोषणा

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासाठी मोठी घोषणा केलीय. सहकार क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सहकार क्षेत्राला १८ टक्के कर भरावा लागतो. तो कर आता १५ टक्क्यांवर आणण्यात आलेला आहे. को-ऑपरेटिव्ह सोसायटींना १ ते १० कोटी पर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंतचा कर कमी करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

एनपीएसमध्ये केंद्र आणि राज्याचं योगदान १४ टक्के

दिव्यांग मुलांसाठी पालक इन्शुरन्सची स्किम घेऊ शकतात. तसेच त्याचे फायदे त्यांच्या पालकांचा मृत्यूनंतर दिले जात होते. मात्र, दिव्यांग व्यक्तींना पालक जिवंत असताना सुद्धा गरज लागू शकते. त्यापद्धतीचे बदल नियमात करण्यात आलेले आहे. एनपीएस अकाऊंटच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या टॅक्सबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांमध्ये समानता असावी, यासाठी टॅक्समध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. एनपीएसमध्ये केंद्र आणि राज्याचं योगदान १४ टक्के असणार आहे.

- Advertisement -

सहकारी संस्थांवरील करात २५ ऐवजी १५ टक्क्यांची कपात

सहकारी संस्थांवरील करात २५ ऐवजी १५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. इन्कम टॅक्स रिटर्नमधील सुरूत्रीकरणासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. व्हर्च्युअल डिजिटल असेट्स जर तुमच्या नावावर करण्यात आले असतील तर तुम्हाला ३० टक्के कर द्यावा लागणार आहे.

क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार

डिजिटल असेट्स आणि क्रिप्टोकरन्सीबाबत एक नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. क्रिप्टोच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार आहे. तसेच डिजिटल संपत्तीच्या ट्रान्सफरवर सुद्धा ३० टक्के कर लागू करण्यात येणार आहेत. उद्योगांमधील सेस कर खर्च म्हणून धरला जाणार नाहीये.

- Advertisement -

हेही वाचा : Budget 2022 : शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवणार, धान्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -