घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातच्या 'या' गावात निवडणुकीच्या प्रचारसभांना मनाई, मतदान न केल्यास होते दंडात्मक कारवाई

गुजरातच्या ‘या’ गावात निवडणुकीच्या प्रचारसभांना मनाई, मतदान न केल्यास होते दंडात्मक कारवाई

Subscribe

१९८३ सालापासून कोणत्याच पक्षाला या गावात प्रचारासाठी परवानगी दिली गेली नाहीय. आपण या गावात जाऊन प्रचार केला तर नियमभंग केल्याप्रकरणी येथील नागरिक आपल्याला मतदान करणार नाहीत, या भीतीने कोणताही राजकीय पक्ष वा निवडणुकीला उभा राहिलेला कोणताही उमेदवार येथे प्रचाराला जात नाही.

गुजरातमध्ये निवडणुकींच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. काँग्रेस, भाजपा आणि आपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. गुजरात राज्याच्या विविध मतदारसंघात जाऊन स्थानिकांशी वैयक्तिक चर्चा सुरू आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील एका गावात शांतता पसरली आहे. राजकोट जिल्ह्यातील राज समधियाला गावांत प्रचार फेऱ्या होत नाहीत. येथील नागरिकांनी या प्रचार फेऱ्या का होत नाहीत, याबाबत इनसाईड स्टोरी सांगितली आहे.

या गावातील लोकांनी कोणत्याही पक्षातील नेता, कार्यकर्त्यांना या गावात येण्यास, प्रचार करण्यास मनाई केली आहे. प्रचाराला मनाई असली तरीही येथील गावातील लोक मतदान जरुर करतात, जे करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाते. निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना येथे प्रचार करण्यास परवानगी देणे त्या क्षेत्रासाठी हानिकारक आहे. त्यामुळे या गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करण्यास परवानगी नाही.

- Advertisement -

राज समाधियाला गाव हे राजकोट जिल्ह्यात २० किलोमीटर अंतरावर आहे. येथे प्रचार सभांना मनाई असली तरीही मतदान करणे अनिवार्य केले आहे. मतदान न केल्यास संबंधित व्यक्तीला ५१ रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. ग्राम विकास समितीने गावातील लोकांसाठी हे नियम बनवले आहेत. गावातील लोकांना हे नियम पाळणं बंधनकारक असतं. नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. ग्राम विकास समितीच्या या निर्णयामुळे या गावात १०० टक्के मतदान होते.

या गावातही सामान्य सहभागाने सरपंच निवडला जातो. दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याने येथे १०० टक्के मतदान होत असल्याचं येथील सरपंचाने सांगितलं. या गावात अवघी १७०० लोकसंख्या असून या लोकांनी एक समिती स्थापन केली आहे. निवडणुकीच्या आधी समिती एक बैठक बोलावते. मतदान करण्यास कोणी असमर्थ ठरत असल्यास त्याबाबत कारणे द्या नोटीस पाठवली जाते.

- Advertisement -

१९८३ सालापासून कोणत्याच पक्षाला या गावात प्रचारासाठी परवानगी दिली गेली नाहीय. आपण या गावात जाऊन प्रचार केला तर नियमभंग केल्याप्रकरणी येथील नागरिक आपल्याला मतदान करणार नाहीत, या भीतीने कोणताही राजकीय पक्ष वा निवडणुकीला उभा राहिलेला कोणताही उमेदवार येथे प्रचाराला जात नाही.

राज समधियाला हे गाव लहान असलं तरी आधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. या गावात वायफायच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शन जोडले गेले आहे. तसंच, गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात आला आहे. या ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या गावाची लोकवस्ती १७०० असली तरीही येथे फक्त ९९५ मतदार आहे. हे मतदार त्यांना हव्या असलेल्या पक्षाला वा उमेदवाराला मतदान करतात.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -