घरदेश-विदेशकाँग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायेत - जावडेकर

काँग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायेत – जावडेकर

Subscribe

तिरंग्याचा आपमान देश कधीच विसरणार नाही.

दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनावर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आण डावे पक्ष शेतकऱ्यांन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तर काँग्रेस देशात अशांती आणि हल्ले घडवून आणत आहे. असेही प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दिल्लीत झालेले हिंसक आंदोलन हे निंदनीय आहे. तिरंग्याचा आपमान देश कधीच विसरणार नाही. लाल किल्ल्यावर पोलीसांनी कमालीचे संयम दाखवले आहे. पोलिसांकडे शस्त्र असूनही त्यांनी त्याचा वापर केला नाही. आंदोलकांनी पोलिसांवर लाठी, तलवारीने हल्ला केला परंतु पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिले नाही. काँग्रेस आणि राहूल गांधींकडून सातत्यानं शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर चांगलीच टीका केली आहे. संपूर्ण देशात निंदाचे स्वर उमटायला लागल्यावर राहूल गांधी म्हणाले की, हिंसा कोणत्याही समस्येचे समाधान नाही. शांतता राखण्याचे त्यांनी अवाहन केले. ही पाश्चात बुद्धी असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसची हारले आहे आणि हाताश झाले आहे.

- Advertisement -

आता कम्युनिस्ट पक्षाचीही परिस्थितीती सारखीच झाली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही नव्या मित्र पक्षाच्या शोधात आहे. हे पक्ष कोणत्याही प्रकारे देशात हिंसा घडवण्याचा प्रयत्न करत असतात. कधी हिंसा करणे, पोलिसांवर लाठीमार, गोळीबार करणे हीच काँग्रेसची राजनिती वाचली आहे. बीजेपी आणि मोदींची लोकप्रियता वाढत आहे. तर काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांची लोकप्रियतेत घट होत आहे. त्यांना आता भविष्याची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारले आहे. परंतु त्याच काँग्रेसी अहंकारासोबत हिंसा भडकवण्याचे काम करत आहेत.

लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेत काल दिल्ली पोलिसांनी कमालीचा संयम दाखवला. पोलिसांकडे शस्त्र होते परंतु त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यांच्यावर तलवार, लाठी आणि दगडांनी हल्ला करण्यात आला तरिही दिल्ली पोलिसांनी आपला संयम सोडला नाही. तसेच काही वेळातच हे प्रकरण निवळेल.

- Advertisement -

कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलकांसोबत केंद्र सरकारने चर्चेच्या १० फेऱ्या पार पाडल्या आहेत. एक ते दीड वर्षे कृषी कायद्यांवर स्थगिती आणण्याचीही तयारी दाखवली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा कोणताच अधिकार कमी झाला नाही तसेच कोणत्याही अधिकाराला हटविण्यात आला नाही. काँग्रेसलाही हे समजत आहे. परंतु काँग्रेस हा कायदा समजून घेण्यास तयार नाही. असे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश जावडेकर यांनी पुढे म्हटले आहे की, कधी कधी मला असे वाटते की, जे हारले आहेत तेच सगळे एकत्र येत देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ जानेवारीला काँग्रेसे शेतकऱ्यांना भडकवते त्यामुळे काँग्रेस पातळी किती बिघडली आहे. हे आपण पाहिले आहे. काँग्रेस या जिम्मेदारीपासून पळ काढू शकत नाही कारण पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यांची सरकार असूनही ही हिंसा घडली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या राजनितीची आम्ही निषेध व्यक्त करत आहोत. तसेच जनताच त्यांना उत्तर देल हे त्यांनी समजले पाहिजे.

पुर्वीही सीएएच्या वेळी अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. आता यावेळी ते दुसऱ्यांदा प्रयत्न करत आहेत. अजूनही प्रयत्न करतील परंतु त्यांना यामध्ये यश मिळणार नाही. देशातील जनता विकासासाठी भाजपा सरकारविरोधात उभे आहेत. इतर राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन करत नाही आहेत. काँग्रेसच्या प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलन करत नाही आहेत. असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -