घरमहाराष्ट्रSanjay Raut : आंबेडकरांच्या एकला चलो रे भूमिकेवर संजय राऊत म्हणतात, ...संविधानाचे...

Sanjay Raut : आंबेडकरांच्या एकला चलो रे भूमिकेवर संजय राऊत म्हणतात, …संविधानाचे दुर्दैव

Subscribe

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली. याशिवाय मंगळवारी त्यांनी मराठ आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआसोबत न राहता स्वतंत्र निवडणूक लढवतील किंवा इतरांना एकत्र घेऊन आपलीच वेगळी आघाडी निर्माण करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आज प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी 9 उमेदवार जाहीर केले असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे, असे मी मानत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (On Prakash Ambedkar’s Ekla Chalo Re role, Sanjay Raut says the misfortune of the Constitution)

हेही वाचा – Ambadas Danve : ये साजिशों का दौर है और…; ठाकरे गटाच्या पहिल्या यादीनंतर अंबादास दानवे नाराज?

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आघाडीत जागावाटप करताना अनेक मर्यादा येतात. तरी आम्ही क्षमतेपेक्षा जास्त जागा वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रयत्न केला. पाच जागा त्यांना आधीच दिल्या. गरज पडल्यास सहावी जागा देण्याचेही ठरले होते. कोणत्याही परिस्थिती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत होणार नाही, अशी काळजी घेण्याचे आमचे ठरले होते. प्रकाश आंबेडकर यांनी नऊ उमेदवार जाहीर केल्या असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे, असे मी मानत असल्याचे संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले की, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत. जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असं आम्ही मविआला सांगितलं होतं. मात्र, त्यांनी लक्ष दिलं नाही. वंचितचा वापर मविआ घराणेशाही वाचवण्यासाठी करत होती. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’

वंचितची उमेदवारी यादी जाहीर 

भंडारा-गोंदिया (संजय गजानन केवट), गडचिरोली-चिमूर (हितेश पांडूरंग मडावी), चंद्रपूर (राजेश वारलूजी बेले), बुलढाणा (वसंत मगर), अकोला (प्रकाश आंबेडकर), वर्धा (राजेंद्र साळुंखे), अमरावती (प्राजक्ता पिल्लेवान), यवतमाळ-वाशिम (खेमसिंग पवार) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून रामटेकमधून आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -