घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : जाहिरातीतील आजोबांची दृष्टी 10 वर्षांत बदलली, एनसीपी-एसपीचा महायुतीवर...

Lok Sabha 2024 : जाहिरातीतील आजोबांची दृष्टी 10 वर्षांत बदलली, एनसीपी-एसपीचा महायुतीवर निशाणा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी – एसपी) एक व्हिडीओ शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत, राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Politics: प्रादेशिक पक्ष टिकले, तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार; राऊतांनी सुनावलं

- Advertisement -

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आलेली लोकसभा निवडणूक आता अटीतटीची बनली आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपाने अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यावरून रान उठवले होते. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना थेट तुरुंगात पाठविण्याची घोषणा केली होती. भाजपाच्या त्यावेळी जाहिरातीसुद्धा सिंचन घोटाळ्याशी संबंधितच होत्या.

- Advertisement -

याची एक व्हिडीओ क्लिपच एनसीपी – एसपीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 2014च्या जाहिरातीत एका वृद्ध यावेळी भाजपाने तयार केलेल्या जाहिरातीतही पाहायला मिळतो. त्यावेळी, पाण्यासाठी 70 हजार कोटी खर्च करूनही एक थेंबही मिळाला नसल्याची तक्रार करणारी ती वृद्ध व्यक्ती यावेळी मात्र पाणी आता घराघरात पोहोचले असल्याचे सांगताना ते दिसतात. त्याबरोबरच फडणवीस हे सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांच्यावर आरोप करतानाच्या क्लिप देखील एसीपी – एसपीने शेअर केल्या आहेत. तसेच, ’70 हजार सिंचन घोटाळ्याचा आरोप खोटा की जाहिराती’ असा प्रश्नही या व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे.

हेही वाचा – MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’

ज्या अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करून 2014च्या निवडणुकीवेळी भाजपाने जाहिराती केल्या होत्या, त्याच जाहिरातींमधील आजोबांना सोबत घेऊन भाजपा आता नव्या जाहिरातींद्वारे पक्षाचा प्रचार करत आहे. यंदाच्या जाहिरातीत मात्र भाजपाकडून अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगण्यात आले आहे. परंतु भाजपाकडून पाळण्यात आलेले हे मौन जनता ओळखून आहे, असा टोलाही एनसीपी – एसपीने लगावला आहे.

हेही वाचा – Lok Sabha : सांगली, ईशान्य मुंबई जागेवरून मविआत धुसफूस; ठाकरेंना फेरविचार करण्याची विनंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -