घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हापरिषदेच्या नवीन प्रारुप आराखड्याने गटांची मोडतोड

जिल्हापरिषदेच्या नवीन प्रारुप आराखड्याने गटांची मोडतोड

Subscribe

जिल्हा परिषद 84 गट, पंचायत समित्यांच्या 168 गणांची रचना जाहीर

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या प्रारुप आराखड्यावर 8 मे 2022 पर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. प्रारुप आराखडा जिल्हा परिषदेसह तालुकास्तरावर तहसिल कचेरी, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आला आहे. यापूर्वी म्हणजे 2017 च्या निवडणुकीत गटांची संख्या ७३ होती. ही संख्या आता ८४ झाल्याने ११ गट नव्याने वाढले आहेत. देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या चार तालुक्यात एकही गट वाढला नसल्याने येथील गट व गण रचना जैसे थे आहे. सिन्नर, बागलाण, दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक व चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक वाढला आहे.

मालेगाव तालुक्यात दोन गट वाढले आहेत. निफाड तालुक्यातील ओझर गट रद्द झाल्याने तालुक्यांमधील १० गटांची पुनर्रचना झाली आहे. प्रारुप आराखड्यात अमुलाग्र बदल झाल्याने काही गट नेत्यांसाठी खूप सोयीचे झाले आहेत. तर काही ठिकाणी मोडतोड झाल्याने राजकीय गणीतच बिघडले आहे. सिन्नरमध्ये माजी अध्यक्षा शीतल सांगळे व उदय सांगळे यांच्यासाठी दोन गट तयार झाले. तर शिवसेनेचे नेते संजय सानप यांची कोंडी झाली आहे. अशाच पध्दतीने निफाडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशा स्वरुपाचे वातावरण आहे. प्रारुप आराखडा जाहीर झालेला असला तरी आरक्षण काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रारुप आराखडा सोयीचा झाला तरी गट आरक्षित झाला तर या सर्वांवर पाणी फिरण्याची भिती नेत्यांना लागून आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे 84 गट व पंचायत समित्यांच्या 168 गणांचा प्रारुप (कच्चा) आराखडा गुरुवारी  जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये 11 गट निर्माण झाल्याने निफाड, मालेगाव, सिन्नर, कळवण, सुरगाणा, चांदवड, पेठ तालुक्यातील गटांची मोडतोड झाल्याने माजी पदाधिकारी व सदस्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असे वातावरण आहे. येवला, नांदगाव, इगतपुरी, देवळा व निफाड तालुक्यात गटांची संख्या ‘जैसे थे’ आहे.

  • बागलाण :   १) मुल्हेर (मानूर, मुल्हेर) २) ताहाराबाद (अंतापूर, ताहाराबाद), 3) जायखेडा (जायखेडा, कोटबेल) 4) नामपूर (नामपूर, अंबासन) 5) विरगाव (विरगाव, भाक्षी), 6) डांगसौंदाणे (डांगसौंदाणे, कंधाणे), 7) ठेंगोडा (ठेंगोडा, मुंजवाड), 8) ब्राह्मणगाव (ब्राह्मणगाव, लखमापूर)
  • मालेगाव : १) अस्ताणे (गाळणे, अस्ताणे) 2) झोडगे (वडगाव, झोडगे), 3) कळवाडी (चिंचगव्हाण, कळवाडी), 4) वडेल (करंजगव्हाण, वडेल), 5) रावळगाव (रावळगाव, अजंग) 6) दाभाडी (चिंचावड, दाभाडी) 7) सौंदाणे (चंदनपुरी, सौंदाणे), 8) टाकळी (टाकळी, जळगाव निंबा) 9) निमगाव (निमगाव, येसगाव बु)
  • देवळा : १) लोहणेर (लोहणेर, खालप), 2) उमराणे (उमराणे, मेशी) 3) खर्डे वाजगाव (वाखारी, खर्डे वा)
  • कळवण : १) पुनदनगर (पुनदनगर, मोकभणगी), 2) मानूर (मानूर, पिंपळकोस), 3) कनाशी (पाळे खु., कनाशी) 4) दळवट (दळवट, जामलेवणी) 5) अभोणा (नरुळ, अभोणा)
  • सुरगाणा : १) गोंदुणे (काठीपाडा, गोंदुणे) 2) भदर (भदर, हट्टी), 3) बोरगाव (मनखेड, बोरगाव), 4) भवाडा (पळसण, भवाडा)
  • पेठ: १) सुरगाणे (सुरगाणे, आंबे), 2) कोहोर (करंजाळी, कोहोर) 3)कुंभाळे (कुंभाळे, पिंपळवटी
  • दिंडोरी : १) अहिवंतवाडी (टिटवे, अहिवंतवाडी) 2) कसबेवणी (कसबेवणी, लखमापूर) 3) खेडगाव (खेडगाव, मातेरेवाडी) 4) वरखेडा (नळवाडपाडा, वरखेडा) 5) कोचरगाव (ननाशी, कोचरगाव) 6) उमराळे बु. (मडकीजाब, उमराळे) 7) मोहाडी (पालखेड, मोहा.)
  • चांदवड : १) धोडंबे (राहुड, धोडंबे), 2) दुगाव (दुगाव, मेसनखेडे खु.) 3) वडनेरभैरव (बहादुरी, वडनेरभैरव) 4) वडाळी भोई (मंगरुळ, वडाळी भोई) 5) तळेगाव रोही (तळेगाव रोही, वाहेगाव साळ)
  • नांदगाव : १)साकोरा (वेहळगाव, साकोरा) 2) न्यायडोंगरी (सावरगाव, न्यायडोंगरी) 3) भालूर (पानेवाडी, भालूर) 4) जातेगाव (मांडवड, जाते.)
  • येवला : १) पाटोदा (पाटोदा, धुळगाव) 2) नगरसूल (सावरगाव, नगरसूल) 3) राजापूर (राजापूर, गवंडगाव) 4) अंदरसूल (उंदिरवाडी, अंदरसूल) 5) मुखेड (चिंचोडी, मुखेड)
  • निफाड : १) पिंपळगाव बसवंत (उंबरखेड, पिंपळगाव) 2) पालखेड (रानवड, पालखेड) 3) लासलगाव (टाकळी विंचूर, लासलगाव) 4) विंचूर (विंचूर, पिंपळगाव नजीक) 5) उगाव (उगाव, नैताळे) 6) पिंपळस (कोठुरे, पिंपळस) 7) कसबे सुकेणे (कोकणगाव, कसबे सुकेणे) 8) चांदोरी (चाटोरी, चांदोरी) 9) सायखेडा (सायखेडा, सोनगाव) 10) देवगाव (नांदुरमध्यमेश्वर, देवगाव)
  • नाशिक : १) गिरणारे (गिरणारे, दुगाव) 2) पिंप्री सय्यद (एकलहरे, पिंप्री सय्यद) 3) शिंदे (पळसे, शिंदे) 4) गोवर्धन (महिरावणी, गोवर्धन) 5) विल्होळी (लहवित, विल्होळी)
    त्र्यंबकेश्वर : १) बेरवळ (खरशेत, बेरवळ) 2) हरसूल (मुलवड, हरसूल) 3) वाघेरा (तळेगाव, वाघेरा) 4) अंजनेरी (देवगाव, अंजनेरी)
  • इगतपुरी :१) खंबाळे (कावनई, खंबाळे) २) वाडीवर्‍हे (वाडीवर्‍हे, साकूर) ३) घोटी बु (मुंढेगाव, घोटी) ४) नांदगाव सदो (काळुस्ते, नांदगाव) 5) धामनगाव (धामनगाव, बेळगाव तर्‍हाळे)
  • सिन्नर :१) माळेगाव (नायगाव, माळेगाव), 2) मुसळगाव (गुळवंच, मुसळगाव) 3) सोमठाणे (सोमठाणे, शहा), 4) पांगरी बु. (वावी, पांगरी) 5) दापूर (डुबेरे, दापूर) 6) शिवडे (पांढुर्ली, शिवडे), 7) नांदुरशिंगोटे (ठाणगाव, नांदुरशिंगोटे)

घडलं बिघडलं

  1. सिन्नर : तालुक्यात यापूर्वी ६ गट होते. यात एक वाढल्याने आता ७ गट झाले आहेत. नायंगाव, देवपूर, चास व ठाणगाव या गटाची पुनर्रचना झाली असून नव्याने माळेगाव, सोमठाणे, पांगरी बु, दापूर, शिवडे हे गट तयार झाले. माजी अध्यक्षा शीतल सांगळे किंवा उदय सांगळे यांच्यासाठी दोन गट मोकळे.
  2. निफाड : गटांची संख्या १० होती. त्यातील ओझर गट रद्द झाला आणि पिंपळस हा गट निर्माण झाला. पुनर्रचना झाल्याने माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या गटातील गावे दुसर्‍या गटात गेली आहेत.
  3. बागलाण : यापूर्वी ७ गट असताना एक गट वाढला. आता ८ गट तयार झाले आहेत. पठावे दिगर या गट रद्द होऊन डांगसौदाने व मुल्हेर हे नवीन गट तयार झाले आहेत.
  4. मालेगाव : यापूर्वी ७ गट असताना दोन गट वाढले आहेत. त्यामुळे आता तालुक्यात ९ गट तयार झाले आहेत. यात वडनेर गट रद्द झाला असून नव्याने अस्ताणे, वडेल, टाकळी हे गट तयार झाले आहेत.
  5. कळवण : पूर्वी ४ गट असताना यात एकाची वाढ झाली असून आता ५ गट तयार झाले आहेत. खर्डे दिगर गट रद्द झाला असून पुनद नगर व दळवट हे नवीन गट तयार झाले आहेत.
  6. सुरगाणा : पूर्वी तीन गट होते. यात एकाची वाढ होऊन आता ४ गट तयार झाले आहेत. हट्टी गट रद्द झाला असून भदर व बोरगाव हे नवीन गट तयार झाले आहेत.
  7. पेठ : पूर्वी दोन गट होते, यात एक गट वाढला आहे. आता तीन तयार झाले आहे. धोंडमाळ गट रद्द झाला असून सुरगाणे व कुंभाळे हे नवीन गट अस्तित्वात आले आहे.
  8. दिंडोरी : पूर्वी ५ गट होते यात एकाची वाढ झाली असून सहा गट तयार झाले आहे. वरखेडा हा नवीन गट तयार झाला आहे.
  9. चांदवड : पूर्वी ४ गट होते यात एकाची वाढ झाली असून ५ गट झाले आहे. धोंडाबे या नवीन गट तयार झाला आहे.
  10. नाशिक : ४ गट होते यात एक वाढला असून आता ५ गट तयार झाले आहेत. पिंप्री सय्यद नवीन गट तयार झाला आहे.
  11. त्र्यंबकेश्वर : पूर्वी तीन गट होते. यात एक वाढल्याने आता ४ गट झाले आहेत. ठाणापाडा गट रद्द होऊन बेरवळ व वाघेरा गट तयार झाला आहे.
  12. नांदगाव, येवला, देवळा, इगतपुरी : या चार तालुक्यांमधील गटांच्या संख्या कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे येथील नेत्यांना आता फक्त आरक्षणाची प्रतीक्षा लागून आहे.

जिल्हा परिषद गट व 15 पंचायत समित्यांच्या गणांची रचना जाहीर झाल्यामुळे आता प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. परंतु, आरक्षण सोडत केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. येत्या 13 जून 2022 रोजी जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत निघणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. परंतु, याविषयी शासनाकडून अद्याप कुठलेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेले नाही. अथवा माहिती देण्यात आलेली नाही. पण आरक्षण सोडतीनंतरच खर्‍या अर्थाने लढत स्पष्ट होतील.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -