सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे दीर्घ आजाराने निधन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले आहे. शनिवार 27 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

congress leader sonia gandhi admitted in sir gangaram hospital for routine checkup

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले आहे. शनिवार 27 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांच्या आई दीर्घ काळापासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाची बातमी काँग्रेसचे मीडिया प्रमुख जयराम रमेश यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

“सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे 27 ऑगस्ट रोजी इटलीत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या दफनविधीचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला”, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे.

इटलीमध्ये सोनिया गांधी यांचे संपुर्ण कुटुंब राहत होतं. सोनिया गांधी यांच्या आईचं तीन दिवसापुर्वी निधन झाले आहे. गांधी परिवाराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर आलेली नाही. पण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटकरुन ही माहिती दिली आहे. काल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी बरेच वेळा त्यांच्या उपचारासाठी इटलीलाही जात होते. मागच्याच आठवड्यात सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या.


हेही वाचा – देश आणि महाराष्ट्रासमोरचे सर्व विघ्न विघ्नहर्त्याने दूर करावे; फडणवीसांचे गणरायाला साकडं