घरताज्या घडामोडीलसीकरणामुळे नाही तर गर्भ निरोधक गोळ्या आणि धूम्रपाने होतात रक्ताच्या गुठळ्या

लसीकरणामुळे नाही तर गर्भ निरोधक गोळ्या आणि धूम्रपाने होतात रक्ताच्या गुठळ्या

Subscribe

गर्भ निरोधक गोळ्या आणि धूम्रपान केल्यामुळे होतात रक्ताच्या गुठळ्या.

एकीकडे देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र, काही गैरसमजामुळे लसीकरणाचा वेग कमी झाल्याचे आता समोर आले आहे. युरोपमधील काही देशांमध्ये ऑक्सफर्ड आणि AstraZeneca लसीमुळे काही जणांना रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे समोर आले आणि त्याचाच परिणाम भारतामधील लसीकरणावर देखील झाला. अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. मात्र, लस घेतल्याने खऱ्याच रक्ताच्या गुठळ्या होतात का? की यामागचे दुसरे काही कारण आहे. याचा आढावा घेतल्यास कोरोनाच्या लसीमुळे नाहीतर गर्भ निरोधक गोळ्या आणि धूम्रपाने रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीस कंट्रोल (CDC) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी विधान केले होते की, ‘जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतल्यामुळे काही दिवसात रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यामध्ये १८ ते ४८ वर्षांच्या सहा महिलांचा समावेश होता’.

- Advertisement -

दरम्यान, स्पेनच्या डॉक्टर मारिया लियोनोर रामोस यांनी सांगितले की,‘जर १० लाख लोकांनी कोरोनाचे लसीकरण करुन घेतले तर त्यातील केवळ चार जणांना कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्यात. त्यामुळे या रक्ताच्या गुठळ्या लसीकरणामुळे नाही तर त्याला इतरही कारण असावीत. त्यानंतर, असे समोर आले की, ‘गर्भ निरोधक गोळ्या घेणाऱ्या १० लाख महिलांमधील ५०० ते १२०० महिलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. म्हणजेच ०.०५ ते ०.१२ टक्के लोकांना गर्भ निरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे हा त्रास झाला. तर धूम्रपान करणाऱ्या १० लाख लोकांपैकी १ हजार ७६३ लोकांना देखील रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या उद्भवली म्हणजेच ०.१८ टक्के प्रमाण हे धूम्रपान केल्यामुळे होत असल्याचे समोर आले.’

अमेरिकेतील FDAचे कार्यकारी आयुक्त डॉ. जैनेट वुडकॉक यांच्या म्हणण्यानुसार, ‘जॉन्सन अँड जॉन्सन याचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. कारण लोकांच्या रक्तात प्लेटलेट्सचे प्रमाण देखील कमी दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेत याबाबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार त्याचा वापर केला जाईल’.

- Advertisement -

हेही वाचा – उत्तरप्रदेशात कोरोनाचा उद्रेक! १२ पेक्षा जास्त IAS अधिकारी पॉझिटिव्ह, CM योगी होम आयसोलेशनमध्ये


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -