घरदेश-विदेशउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण

Subscribe

महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशात देखील कोरोना संक्रमित लोकांचा आकडा वाढताना दिसतोय. उत्तरप्रदेशातील साधारण १२ हून अधिक आयएएस अधिकाऱ्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयात देखील कोरोनाचा संसर्ग पसरला असून त्यांचे मुख्य सचिव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मोठ्या संख्येने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले होते. दरम्यान, त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असून या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती योगी यांनी ट्वीट करून दिली आहे. यासह योगींनी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपली कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन केले असून काळजी घेण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

उत्तरप्रदेश सरकारच्या १२ हून अधिक आयएएस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. वित्त सचिव संजय कुमार आणि मुख्य सचिव यांच्यासह वित्त विभागातील साधारण २० लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यांच्यासह महसूल परिषदेचे अध्यक्ष दीपक त्रिवेदी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव देवेश चतुर्वेदी, अल्पसंख्यक कल्याण विभागाचे प्रमुख सचिव बीएल मीना, नगर विकासचे एसीएस डॉ. रजनीश दुबे, सीएम ऑफिसचे प्रमुख सचिव एसपी गोयल, कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव सुरेश चंद्रा, उच्च शिक्षण विभागाच्या एसीएस आराधना शुक्ला, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव वीणा कुमारी, पाटबंधारे विभागाचे प्रधान सचिव अनिल गर्ग आणि विशेष सचिव प्रशांत शर्मा, मुख्य सचिव कर्मचारी अधिकारी अमृत त्रिपाठी आणि हमीरपूरसह तीन जिल्ह्यांचे डीएम कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांचे मुख्य सचिव पी एस गोयल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे सचिव अमित सिंग आणि ओएसडी अभिषेक कौशिक यांनाही संसर्ग झाला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सरकारी घरातील सदस्यांपैकी दोन लोकही कोरोनाचे बळी ठरले आहे. यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी स्वत: ला आयसोलेट केले असून त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. “माझ्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे अधिकारी माझ्याशी संपर्कात होते. म्हणून मी सावधगिरी म्हणून स्वत: ला वेगळे ठेवले आहे.”

- Advertisement -


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -