घरदेश-विदेशकोरोना संपलेला नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा

कोरोना संपलेला नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा

Subscribe

देशात अलीकडेच कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने सर्वच राज्यांमधील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यातच कोरोनाच्या नव्या एक्सई व्हेरिएंटचा रुग्ण मुंबईत सापडल्याने दहशत वाढलेली असताना कोरोना व्हायरस संपलेला नाही आणि तो पुन्हा कधीही वाढू शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या, दुर्लक्ष करू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला.

नरेंद्र मोदी पाटीदार समाजाचे दैवत मानल्या जाणार्‍या माँ उमियाच्या मंदिराच्या १४व्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले की, बहुरूपिया कोरोना कधी कोणत्या रूपात परत येईल हे कोणालाच ठाऊक नाही. देशातील जनतेच्या पाठिंब्यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी लसींचे जवळपास १८५ कोटी डोस देणे शक्य झाले आहे. कोरोना नावाची महामारी संपल्याचे वाटत असताना तो पुन्हा कधीही वाढू शकतो. त्यामुळे दक्षता घ्या, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -