घरदेश-विदेशकोरोनापाठोपाठ आता चीनकडून कॅट क्यू विषाणूचा हल्ला

कोरोनापाठोपाठ आता चीनकडून कॅट क्यू विषाणूचा हल्ला

Subscribe

आइसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार कॅट क्यू विषाणूमुळे  (सीक्यूवी) तीव्र स्वरूपाचा ताप येतो. मेनिनजाइटिस आणि पेड्रियाट्रिक इंसेफ्लाइटिस सारख्या समस्या या विषाणूमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. 

चीनमधून आलेल्या कोरोनाचा विळखा साऱ्या जगाला बसला आहे. यातून अद्याप जग सावरले नसताना आता आणखी एका विषाणूचा प्रसार चीनकडून होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे संशोधकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आइसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार कॅट क्यू विषाणूमुळे  (सीक्यूवी) तीव्र स्वरूपाचा ताप येतो. मेनिनजाइटिस आणि पेड्रियाट्रिक इंसेफ्लाइटिस सारख्या समस्या या विषाणूमुळे निर्माण होण्याची शक्यता आहे.


आइसीएमआरच्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेतील सात संशोधकांनी सांगितले की, चीन आणि व्हियातनाम या देशांमध्ये क्यूलेक्स मच्छर आणि डुकरांमध्ये कॅट क्यू  (सीक्यूवी) विषाणू आढळतो. भारतामध्ये काही दिवसांपासून क्यूलेक्स मच्छरच्या प्रजातींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भारतामध्ये धोक्याची घंटा वाजू लागली आहे. चीनमधील या क्यूलेक्स मच्छरामुळे आशियाई देश कॅट क्यूच्या विळख्यामध्ये सापडण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. आयसीएमआरच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील अनेक राज्यांतून ८८३ पेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी दोन नमुन्यामध्ये या विषाणूचे अँटीबॉडी आढळले. त्यामुळे या दोन व्यक्ती या विषाणूने बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र तपासणीमध्ये एकाही व्यक्तीच्या शरीरामध्ये हा विषाणू सापडला नाही. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चच्या जूनमधील अंकामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार कॅट क्यू विषाणूचा संभाव्य धोका समजून घेण्यासाठी मानव आणि डुकरांमधून अधिकाधिक नमुन्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे.

 
भारतामधील एजिप्टी, सीएक्स-क्विनक्यूफैसिटस और सीएक्स-ट्राइटेनियोंहिंचस या मच्छरांच्या प्रजातीमध्ये सीक्यूवी आढळून येतो. या मच्छरांमार्फत सीक्यूवी मानवी शरीरामध्ये सहज प्रवेश करतो. आइसीएमआरला मिळालेल्या माहितीनुसार पाळीव डुक्कर हे सस्तन प्राणी असून त्यांच्यामधे हा विषाणू सापडला आहे, चीनमधील डुकरांच्या शरीरात या विषाणूची अँटीबॉडी सापडली आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -