घरताज्या घडामोडीLive Update : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार

Live Update : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार

Subscribe

2022 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा

CDC बिपीन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण जाहीर

- Advertisement -

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार

सीरमचे संस्थापक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार

- Advertisement -

CDC बिपीन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण

डॉ. हिम्मतराव बावसकर, सुलोचना चव्हाण, सोनु निगमला पद्मश्री,

उद्योजक नटराजन चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार

विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

दिवंगत डॉ. बालाजी तांबे यांना पद्मश्री

व्हिक्टर बॅनर्जी यांना पद्मभूषण पुरस्कार


राज्यातील महाविद्यालये २ फेब्रुवारीपासून होणार सुरु


औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचं नावं द्यावं, हा प्रस्ताव केंद्राकडे आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद महापालिकेवरील भगवा उतरू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद विमानतळाचं बारसं झालं पाहिजे, केंद्र सरकार लवकरचं करेल- मुख्यमंत्री

नाट्यगृहांचं वेळोवेळी नूतनीकरण करणं गरजेचं -मुख्यमंत्री


मालेगावात काँग्रेसमध्ये खिंडर, 27 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित करणार प्रवेश


भाजप आमदार नितेश राणे यांची अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता २७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी बाजू मांडणार मांडणार आहेत.


शिवसेनेचे आमदार आशिष जैसवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली असून त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केपी मौर्य आणि इतर भाजप नेते सीईसी बैठकीसाठी भाजप मुख्यालयात पोहोचले.


अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. उद्या शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उपस्थितीत राहणार आहेत.


दिल्लीत गेल्या १० दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह दर २० टक्क्यांनी कमी झाला आहे. आज १० टक्के दर आहे, १५ जानेवारील पॉझिटिव्हीटी दर ३० टक्के होता. हे सर्व लसीकरणाच्या सातत्यपूर्ण गतीमुळे होत आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.


सेन्सेक्स आजही घसरला आहे. ८०० अंकांनी घसरला असून सध्या ५६,९२० अंकांवर आहे.


देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५५ हजार ८७४ रुग्णांची नोंद झाली असून ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ६७ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर बातमी वाचा 


मुंबई भाजप कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केले गेले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.


देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची ९ राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या अनुषंगाने चर्चा केली जाणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -