घरताज्या घडामोडीLive Update : ओबीसी आरक्षणाप्रकरणी 25 फेब्रुवारीला होणार सुनावणी 

Live Update : ओबीसी आरक्षणाप्रकरणी 25 फेब्रुवारीला होणार सुनावणी 

Subscribe

एसटीच्या संपाबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी


राज्यात 806 नवे कोरोनाबाधित रुग्ण तर 4 रुग्णांचा मृत्यू

- Advertisement -

गेल्या 24 तासात मुंबईत 96 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाप्रकरणी 25 फेब्रुवारीला होणार सुनावणी


आम्हाला राज्य परिवर्तनासाठी हवं आहे- देवेंद्र फडणवीस

दत्तक घ्यायचं म्हणजे दलाली खाणं नव्हे- देवेंद्र फडणवीस

नाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल – देवेंद्र फडणवीस


काहीजण फक्त भगवा मिरवण्याच काम करतायत – देवेंद्र फडणवीस


विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिक विमानतळावर दाखल, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत.


हिजाब वादा प्रकरणी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू


चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावला आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातून महापालिकेचे पथक बाहेर.


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोगासमोर साक्ष नोंदवली


मुंबईतील पेडर रोडसह ६ ठिकाणी ईडीच्या धाडी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे कनेक्शन तपासण्यासाठी ईडीचे धाडसत्र सुरू आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषदेसाठी रवाना


नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्यावर महापालिका पथक दाखल


जुहू परिसरातील एका इमारतीला आग लागली आहे. सी प्रिन्सेस हॉटेलच्या इमारतीला ही आग लागली आहे.


नारायण राणेंच्या जुहू येथील अधीश बंगल्याबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेचे पथक सांताक्रूझ पोलीस स्टेशनला पोहोचले आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहूमधील बंगाल्याची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे पथक रवाना. थोड्याच वेळात राणेंच्या बंगल्यावर धडकणार.


गोव्यातील १ली ते १२वीचे वर्ग आजापासून सुरू झाले.


भाजप नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत राऊतांनी केलेल्या अपशब्दांवर आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पाठवलेल्या नोटीस याबाबत किरिट सोमय्या बोलणार आहेत.


दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्र रोमीत चव्हाण यांना वीरमरण आले. शहीद जवान रोमीत चव्हाण यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगावमध्ये रोमीत यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहू बंगल्याची महापालिकेचे पथक आज पाहणी करण्याची शक्यता आहे. राणे आणि शिवसेनेतील वाद सुरू असताना मुंबई महापालिकेने नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. सकाळी ११.०० वाजता महापालिका पथक बंगल्याची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.


उत्तर प्रदेश विधानसभेच्या चौथ्या टप्प्यात ९ जिल्ह्यातील ६० जागांसाठी २३ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठीच्या प्रचारसभा आज थंडावतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -