घरCORONA UPDATEचीनच्या 'या' बेटावर कोरोनाचा विस्फोट; रेल्वे, विमानसेवा बंद, ८० हजार पर्यटक अडकले

चीनच्या ‘या’ बेटावर कोरोनाचा विस्फोट; रेल्वे, विमानसेवा बंद, ८० हजार पर्यटक अडकले

Subscribe

रविवारी येथे पाचशेहून अधिक पर्यंटक कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने स्पा, काराओके, पब, बार यांसह सिनेमागृह आणि इतर सार्वजणिक ठिकाणं तातडीने बंद केली.

चीनमधील सान्या या पर्यंटनस्थळ असलेल्या शहरात कोरोनाचा विस्फोट झाला असून पाचशेहून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रेल्वे सेवा आणि विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी सान्या शहरात ८० हजाराहून अधिक पर्यंटक अडकले आहेत.

हेही वाचा – हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू

- Advertisement -

चीनच्या दक्षिणी द्विपावर हैनान येथे सान्या हे शहर असून तेथील लोकसंख्या १० लाखाहून जास्त आहे. जगप्रसिद्ध पर्यंटनस्थळ म्हणून हे शहर प्रसिद्ध असल्याने येथे पर्यंटकांची नेहमी वर्दळ असते. जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यंटक येत असतात. रविवारी येथे पाचशेहून अधिक पर्यंटक कोरोना पॉझिटीव्ह आढळले. त्यानंतर कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने स्पा, काराओके, पब, बार यांसह सिनेमागृह आणि इतर सार्वजणिक ठिकाणं तातडीने बंद केली. सध्या सुपरमार्केट आणि फार्मेसी यासारख्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. पर्यंटकांनाही शहर सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ७ दिवसात ५ वेळा कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच पर्यंटकांना शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – NTAकडून JEE सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर; अमरावतीचा श्रेणिक साकला देशात अव्वल

- Advertisement -

हैनान व्दिप हे जगप्रसिद्ध पर्यंटनस्थळ आहे. येथील सान्या सिटी हे पर्यंटकांचे आवडते डेस्टीनेशन असून सर्फींग स्पॉट आहे. गेल्या दोन वर्षांपासून चीनमध्येही पर्यंटनस्थळ बंद होती. पण जसजसा कोरोना निय़ंत्रणात आला तसे काही नियम शिथिल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -