घरदेश-विदेशCorona Update : देशात कोरोनाच्या ३ हजार नव्या रुग्णांची भर, मृतांचा आकडाही...

Corona Update : देशात कोरोनाच्या ३ हजार नव्या रुग्णांची भर, मृतांचा आकडाही वाढला

Subscribe

Corona Update From India | गेल्या १५३ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. २४ तासांत नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील ४८३ रुग्ण आहेत.

Corona Update From India | नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत संपूर्ण देशात ३ हजार १६ नवे कोरोना रुग्ण (New Corona Patients) सापडले आहेत. तर, १ हजार ३९६ रुग्णांनी कोरोनावर (Discharged Corona Patients) मात केली आहे. गेल्या १५३ दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. २४ तासांत नोंद झालेल्या नव्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील ४८३ रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासांत ३ हजार नव्या कोरोना रुग्णाची भर पडल्याने देशातील पॉझिटीव्हीटी रेट (Positivity Rate) २.७३ टक्क्यांवर गेला आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patients) संख्या १३ हजार ५०९ झाली आहे. २ ऑक्टोबर २०२२ रोजी देशात ३ हजार ३७५ रुग्ण आढळले होते, त्यानंतर आज नव्या रुग्णांचा आकडा तीन हजार पार गेला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी रेट २.७३ टक्के असून, आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट १.७१ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन मृत्यू महाराष्ट्रातील असून २ दिल्ली आणि एक हिमाचल प्रदेशमधील आहे. उर्वरित आठ मृत्यू एकट्या केरळमधील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – देशात कोरोनाचा धोका वाढला; WHOने जारी केल्या नव्या सूचना

मुंबईत काय परिस्थिती?

- Advertisement -

गेल्या २४ तासांत मुंबईत १३९ नवे रुग्ण सापडले आहेत. यापैकी १२५ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळेली नाहीत. १४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार असून ४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. काल दिवसभरात १७ रुग्ण बरे झाले असून ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दिल्लीतही रुग्ण वाढले

दिल्लीत कोरोनाची 300 नवे रुग्ण आढळून आले असून दोन मृतांची नोंद झाली आहे. राज्य सरकारने दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -