घरताज्या घडामोडीLive Update: समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळेपर्यंत ड्रग्ज क्रूझ प्रकरणातील तपास...

Live Update: समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळेपर्यंत ड्रग्ज क्रूझ प्रकरणातील तपास अधिकारी राहतील – NCB उपमहासंचालक

Subscribe

समीर वानखेडे यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळेपर्यंत ड्रग्ज क्रूझ प्रकरणातील तपास अधिकारी राहतील – NCB उपमहासंचालक


समीर वानखेडे यांची एनसीबीकडून ४ तास झाली चौकशी

- Advertisement -

दिवाळीसाठी राज्यसरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी दिवाळीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर होणारी गर्दी टाळावी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी देखील घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आर्यन खानच्या जामीनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आर्यनच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी २ वाजचा आर्यनच्या जामीन आर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजची रात्र देखील आर्यनला तुरुंगातच काढावी लागणार आहे.

- Advertisement -

आर्यनचे वकील मुकुल रोहतगी,सतीश मानेशिंदे उच्च न्यायालयात दाखल झाले असून. सध्या अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाईंचा युक्तिवाद सुरू आहे.


समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले असून व्हिजिलन्स टीमकडून जबाब नोंदवण्यात येत आहे.  काही कागदपत्र आणि रेकॉर्डिंगस ताब्यात घेण्यात आली आहेत.


क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीची ५ अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाली असून आता मुंबईच्या एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे.


क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याची एनसीबी चौकशी सुरू झाली. डीआयजी ज्ञानेश्वर सिंह साईलची चौकशी करत आहेत.


दिल्लीत चौकशी झाल्यानंतर समीर वानखेडे काल रात्री मुंबईत परतले.


समीर वानखेडे यांचे वडील दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेणार


क्रूझवर कोणतीही छापेमारी केली नाही – नवाब मलिक


क्रझवरील सर्व सीसीटीव्ही तपासावे – नवाब मलिक


क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय माफिया होते. त्याची प्रेयसी बंदुकीसह क्रझवर होती. – नवाब मलिक


सचिन वानखेडेंसह त्यांचे चालक आणि प्रभाकर यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

#Live: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद लाईव्ह

#Live: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद लाईव्ह

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, October 26, 2021

 


देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ४५१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५८५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १४ हजार २१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४२ लाख १५ हजार ६५३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ५५ हजार ६५३ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ३५ लाख ९७ हजार ३३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात १ लाख ६२ हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आज पुन्हा सकाळी ८.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज नवाब मलिका काय नवा खुलासा करतात आणि समीर वानखेडेंवर कोणता नवीन आरोप करतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आरोप करणारा एनसीबीचा पंच प्रभाकर साईलला एनसीबीचा समन्स बजावण्यात आला आहे. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांसंदर्भात एनसीबीचे पथक आज प्रभाकर साईलची चौकशी करणार आहेत.


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुरू झालेल्या सुनावणीला मंगळवारी स्थगिती देण्यात आली आहे. आज बुधवारी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होणार आहे. मंगळवारी दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. आज एनसीबीचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. काल  आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला.


आज राज्य मंत्रीमंडळाची दुपारी ३.३० वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण आणि एनसीबीच्या कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील महापालिकांमधील सदस्य संख्या वाढवण्याबाबत निर्णय निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -