घरताज्या घडामोडीHome Isolation Guildelines: सौम्य लक्षणांच्या रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय, आरोग्य मंत्रालयाच्या...

Home Isolation Guildelines: सौम्य लक्षणांच्या रुग्णांना आता होम आयसोलेशनचा पर्याय, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स

Subscribe

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे. यादरम्यान सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवीन गाईडलाईडन जारी करण्यात आली आहे. या नव्या गाईडलाईनमुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासंदर्भातल्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत..

२ जुलै २०२० रोजी कोरोना विषयी जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन बदल्यात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असतील किंवा लक्षणे नसतील त्यांना होम आयसोलेशनची शिफारस करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोणतीही लक्षणे दिसून न येणार आणि हवेशीर खोलीमध्ये ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणे नसलेले बाधित (असिम्प्टोमॅटिक) असे घोषित करण्यात आले आहे. श्वासोच्छ्वास करताना दम लागत नसलेल्या परंतु अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टची इन्फेक्शनची लक्षणे असलेल्या आणि हवेशीर खोलीमध्ये ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे असलेले बाधित असे घोषित करण्यात आले आहे.

होम आयसोलेशमध्ये सौम्य लक्षण्यांनी बाधित व्यक्तींसाठी उपचार

  • बाधित व्यक्तींना उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आणि प्रकृती बिघडल्यास त्याची खबर डॉक्टरांनी त्वरित देणे आवश्यक आहे
  • उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अन्य सहव्याधींसाठी असलेली औषधे नियमित चालू ठेवा.
  • ताप, वाहती सर्दी आणि खोकला असल्यास बाधित व्यक्तींना लक्षणांच्या व्यवस्थापनाचे डॉक्टरांच्या शिफारसीनुसार पालन करावे.
  • बाधित व्यक्तींना कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात किंवा दिवसातून दोन वेळा वाफ घ्यावी.
  • दिवसातून चार वेळा देण्यात आलेल्या ६५० मि.ग्रॅ पॅरासिटमॉलच्या गोळ्यांच्या अधिकतम मात्रेमुळे जर ताप नियंत्रित झाला नाही तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लमेंटरी (उदा. नॅप्रोक्सेनच्या २५० मि.ग्रॅ.च्या गोळ्या दिवसातून दोन वेळा) यासरख्या इतर औषधांचे सेवन करण्याचा सल्ला देऊ शकतात.
  • आयव्हरमेक्टीनच्या गोळ्या (२०० मायक्रोग्रॅम/ किलो दिवसातून एकवेळा रिकाम्या पोटी) ३ ते ५ दिवस घ्याव्यात.
  • जर संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसांपेक्षा अधिक काळ लक्षणे तशीच चालू राहिली तर श्वसनाद्वारे घेण्याजोगे ब्युडेझोनाईड (स्पेसर असलेल्या इन्हेलरद्वारे ८०० मायक्रोग्रॅमची दिवसातून दोन वेळा ५ ते ७ दिवस देण्यात येणारी मात्रा) दिले जावे.
  • रेमडेसिवीर किंवा कोणतीही अन्य प्रायोगिक उपचारपद्धती केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच रुग्णालयाच्या वातावरणात हाताळणे आवश्यक आहे. बाधित व्यक्ती घरी असल्याचे रेम़़डेसिवीर प्राप्त करण्याचा किंवा त्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
  • आजाराचे स्वरुप सौम्य असल्याचे मुखावाडे देण्यात येणाऱ्या सिस्टिमॅटिक स्टिरॉईडची शिफारक करण्यास आलेली नाही. जर लक्षणे ७ दिवसांपेक्षा अधिक काळ दिसून आली तर स्टिरॉईडच्या कमी प्रमाणातील मात्रेचे सेवन करण्यासाठी उपचार करणाऱ्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • जर शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली किंवा श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ लागला तर बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे. तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गटाचा सल्ला त्वरित घेणे गरजेचे आहे.
Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -