घरCORONA UPDATECorona Vaccine: तरुणीला एकदाच दिले Pfizer लसीचे ६ डोस, कारण वाचून व्हाल...

Corona Vaccine: तरुणीला एकदाच दिले Pfizer लसीचे ६ डोस, कारण वाचून व्हाल हैराण

Subscribe

लसीचा ओव्हरडोस घेतल्याने तरुणीला त्याचे कोणतेही वाईट परिणाम नाही

जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. कोरोनाची एकामागून एक लाट येत आहे. अनेक देशांमध्ये आजही लॉकडाऊन आहे. जगभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली. सध्या जगभरात अनेक लसी उपलब्ध आहेत. जगभरातील देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. २०२१मध्ये जगात ब्राझील हा देश कोरोनाच्या विळख्यात आहे. ब्राझीलमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अशीच परिस्थिती २०२०मध्ये इटलीमध्ये होती. यावेळी इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. मात्र लसीकरणादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे. मात्र इटलीमध्ये एका तरुणीला एकाच वेळी Pfizer BioNTechच्या लसीचे ६ डोस देण्यात आले. या प्रकरणामागचे कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

इटलीमध्ये राहणारी एक २३ वर्षांची तरुणी लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेली. तिला ठरल्याप्रमाणे Pfizer BioNTechची लस देण्यात आली. तरुणीला लसीचा एक डोस देणे अपेक्षित होते. मात्र एकाच वेळी तब्बल ६ डोस देण्यात आले. एजीआय एजेंसीने दिलेल्या वृत्तानुसार, लस देणाऱ्या नर्सने तरुणीला चुकून लसीचे ६ डोस दिले. नर्सने लसीच्या कुपीतून एक डोस देण्याऐवजी चुकून कुपीतील सर्व डोस तरुणीला दिले. एका कुपीतील डोस हा ६ लसींच्या बरोबरीचा असतो. नर्सच्या चुकीमुळे हा प्रकार घडला.

- Advertisement -

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना लसीचे साइड इफेक्ट दिसतात. इथे तर तरुणीने एकाच वेळी लसीचे ६ डोस घेतले होते. मात्र ६ डोस घेतल्यानंतरही तरुणी ठिक असल्याचे समजते. लसीचा ओव्हर डोस झाल्यानंतर तरुणीला त्वरित Fluids आणि Paracetamol देण्यात आले. लसीचा ओव्हरडोस घेतल्याने तरुणीला त्याचे कोणतेही वाईट परिणाम झाले नाहीत.


हेही वाचा – गरम पाण्याची अंघोळ, गरम पाणी प्यायल्याने कोरोना होत नाही? केंद्राचे स्पष्टीकरण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -