घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटखूशखबर: चीनमध्ये १४ जणांवर कोरोना लसीची यशस्वी चाचणी

खूशखबर: चीनमध्ये १४ जणांवर कोरोना लसीची यशस्वी चाचणी

Subscribe

चीनमधील सर्वात मोठे जैव-युद्ध वैज्ञानिक चेन वेई आणि त्यांच्या टीमने ही लस तयार केली आहे.

कोरोना विषाणूमुळे त्रस्त चीनने १७ मार्च रोजी कोरोना विषाणूसाठी तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या. आता या परीक्षेचे निकाल खूप सकारात्मक आले आहेत. या क्लिनिकल चाचणीसाठी चीनने एकूण १०८ लोकांची निवड केली होती. यापैकी १४ जणांनी लसीची चाचणी पूर्ण केली. १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आता त्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आलं आहे. या सर्व चाचण्या चीनच्या वुहान शहरात केल्या होत्या. लस चाचणी नंतर असे दिसून आलं की, १४ लोकांना घरी पाठवण्यात आल्यानंतर पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहेत. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.


हेही वाचा – धक्कादायक: ‘या’ देशात तीन दिवस मृतदेह रस्त्यांवर पडून

- Advertisement -

दरम्यान, ही लस चीनमधील सर्वात मोठे जैव-युद्ध वैज्ञानिक चेन वेई आणि त्यांच्या टीमने तयार केली आहे. ज्या १०८ लोकांची चाचणी घेण्यात येत होती. हे सर्व लोक १८ ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्व लोक तीन गटात विभागले गेले होते. वेगवेगळ्या गटांना ही लस वेगवेगळ्या प्रमाणात दिली गेली. या सर्व १०८ लोकांना वुहान विशेष सेवा आरोग्य केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या सर्व लोकांना टप्प्याटप्प्यांनी लस दिली गेली आहे. त्यामुळे त्यांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होईपर्यंत तिथेच थांबावं लागेल.

ज्या १४ जणांना घरी पाठवलं गेलं आहे त्यांना सहा महिने वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले जाईल. दररोज त्यांची वैद्यकीय चाचणी होईल. या ६ महिन्यांत कोरोना विषाणूची लागण झाल्यास त्यांचे शरीर काय प्रतिक्रिया याकडे लक्ष आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्याची क्षमता त्यांच्या शरीरात विकसित होईल, म्हणजे त्यांच्या शरीरात प्रतिपिंडे (एंटीबॉडी) तयार होतील. त्यांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ही लस बाजारात आणली जाईल. चेन वी यांनी सांगितलं की आमची पहिली चाचणी जवळजवळ यशस्वी झाली आहे. याची ताकद कळताच आंतरराष्ट्रीय पातळीवर करार करून आम्ही जगाला ते देऊ. कोरोना विषाणूचा उपचार संपूर्ण जगापर्यंत पोहोचवावा अशी आमची इच्छा आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -