Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Vaccine: लस घेतली, पण काही व्यक्तींमध्ये साईड इफेक्ट्सच नाहीत? कारण जाणून...

Corona Vaccine: लस घेतली, पण काही व्यक्तींमध्ये साईड इफेक्ट्सच नाहीत? कारण जाणून घ्या

लस घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट दिसणे ही सामान्य बाब

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. लसीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. लसीनंतर होणाऱ्या साईड इफेक्टमुळे लोकांच्या मनात भिती आहे. लस घेतल्यानंतर डोके दुखणे, अशक्तपणा येणे, ताप,उलटी यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. लस घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट दिसणे ही सामान्य बाब आहे. कोरोनाप्रमाणेच इतर आजारांवर लस घेतल्यानंतर त्यांचे साईड इफेक्ट दिसून येतात त्याचप्रमाणे कोरोना लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसून येतात. मात्र बऱ्याच जणांना लस घेतल्यानंतर काहीच साईड इफेक्ट दिसून येत नाहीत. असे का होते ? यामगचे खरे कारण तज्ज्ञांनी सांगितले आहे.

तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की त्याचे साईड इफेक्ट्स नाही. फायझर लसीच्या क्लिनिकल टेस्टमध्ये असे समोर आले होते की, ५० टक्के लोकांना लस घेतल्यानंतर कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. त्याचप्रमाणे मॉडर्ना लसीच्या बाबतीतही असे म्हटले गेले होते की, दहा पैकी एका व्यक्तीस लसीचे दुष्परिणाम दिसून आले होते. ९५ टक्के लोकांवर लस प्रभावी ठरली होती.

- Advertisement -

कोरोना प्रतिबंधात्मक सर्व लसींमध्ये कोरोना विषाणूच्या बाहेरच्या स्थरांवर असलेल्या स्पाइक प्रोटीन नावाच्या व्हायरल प्रोटीनचा वापर केला जातो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या स्पाइक प्रोटीनवर हल्ला करते त्यामुळे आपल्या शरीरात वेदना होताता म्हणजेच त्याचे साईड इफेक्ट दिसून येतात. मात्र हे साईड इफेक्ट्स एक ते दोन दिवसात संपतात. या दिवसात तयार झालेल्या प्रतिकारक क्षमतेला कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेली रोगप्रतिकारक क्षमता असे म्हणतात. बऱ्याच लोकांना लसीचे साईड इफेक्ट दिसून येत नाहीत याचा अर्थ असा होत नाही की लसीचा काही फायदा होत नाहीय. यावर असे म्हणता येईल की काही लोकांमध्ये जन्मापासूनच रोगप्रतिकारक शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी टी सेल्स आणि अँन्टीबॉडीज तयार होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतरही त्यांना साईड इफेक्ट दिसून येत नाहीत.


हेही वाचा – Corona Virus: सोशल डिस्टन्सिंगवर अभ्यासकांचा नवा खुलासा, कोरोना संक्रमण रोखण्यास आता सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही

- Advertisement -