घरदेश-विदेशCoronaVirus: रशियाला मागे टाकत, भारत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर!

CoronaVirus: रशियाला मागे टाकत, भारत पोहोचला तिसऱ्या क्रमांकावर!

Subscribe

अमेरिका आणि ब्राझील अजूनही कोरोना रूग्णांच्या संख्येत भारतापेक्षा पुढे आहेत.

देशात कोरोना रूग्णांची सातत्याने वाढ होत आहे. जगभरात सर्वाधिक संक्रमित झालेल्या रूग्णांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. रशियाला मागे टाकत कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत भारत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अमेरिका आणि ब्राझील अजूनही कोरोना रूग्णांच्या संख्येत भारतापेक्षा पुढे आहेत. तर पाकिस्तान १२ व्या क्रमांकावर आहे.

वर्ल्डमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात कोरोनाचे ६ लाख ९७ हजार ८३६ रुग्ण आहेत, तर रशियामध्ये आतापर्यंत ६ लाख ८१ हजार २५१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशात १३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान भारतात ६ लाख ९७ हजारांहून अधिक रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यापैकी ४ लाख २४ हजार ८९१ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. तर १९ हजार ७०० रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रूग्णांची तुलाना रशिया देशाशी केली असता रशियामध्ये सध्या एकूण ६ लाख ८१ हजार २५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी ४ लाख ५० हजार ७५० रूग्ण बरे झाले आहे तर १० हजारांहून अधिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित देश म्हणजे अमेरिका असून आतापर्यंत २९ लाखांहून अधिक म्हणजेच २९ लाख ८२ हजार ९२८ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत १७ हजार २४४ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत १ लाख ३२ हजारांहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझील या देशाचा क्रमांक असून तेथे आतापर्यंत १६ लाख ४ हजार ५८५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ६४ हजारांहून अधिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे,


पॉश कॉलनीत नोकर, ड्रायव्हर, सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंगवाल्यांमुळे पसरतोय कोरोना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -