देशात २४ तासांत १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे.

coronavirus community spreed started in india said ima
देशात समूह संसर्गास सुरुवात IMAचा इशारा

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली असून मृतांची संख्या १६ हजार ४७५ झाली आहे. तसेच २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह केसेस असून ३ लाख २१ हजार ७२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग पाचव्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली. १ जूनपासून ३ लाख ३८ हजार ३२४ रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात रविवारी ५४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ६४ हजार ६२६ झाली आहे. तर ७०,६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात १५६ मृत्यू झाले असून मृतांची संख्या ७ हजार ४२९ झाली आहे. मृत्यूदर ४.५१ टक्के एवढा आहे. राज्यात नोंदविलेल्या १५६ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ९६ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, ठाणे २४, जळगाव ६, जालना १ आणि अमरावती १ यांचा समावेश आहे. रविवारी २३३० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ८६,५७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.५९ टक्के एवढे झाले आहे.


हेही वाचा – Corona Live Update: देशात २४ तासांत १९ हजार ४५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!