घरCORONA UPDATECorona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! बाधित रुग्णसंख्या १३ लाख पार!

Corona Update: देशात कोरोनाचा विस्फोट! बाधित रुग्णसंख्या १३ लाख पार!

Subscribe

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीत आढळले आहेत.

देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक होत आहे. देशातील कोरोनाबाधितांचा संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने १३ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३.४५ टक्के इतका आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित संख्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यात आहे.

कोविड-१९ इंडिया.डॉट कॉम (covid19india.org)च्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १२ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज सकाळ पर्यंत १२ लाख ८७ हजार ९४५ कोरोनाबाधितांची संख्या होती. तर ८ लाख १७ हजार २०९ कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या होती. तसेच मृतांची संख्या ३० हजार ६०१वर पोहोचली होती.

- Advertisement -

पण आज रात्रीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३ लाखांच्या पुढे गेली आहे. कोविड-१९ इंडिया.डॉट कॉम (covid19india.org)च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात १३ लाख १५ हजार ७२७ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी ३० हजार ९६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ लाख ३४ हजार ६६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ४९ हजार ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट ६३. ४५ टक्के इतका आहे.

- Advertisement -

 

महाराष्ट्रात आज ९ हजार ६१५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २७८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७वर पोहोचली असून मृतांची संख्या १३ हजार १३२ झाली आहे.


हेही वाचा – Video: ‘भाभीजी पापड खा आणि कोरोनावर मात करा’, भाजपच्या खासदाराचा अजब दावा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -