घरCORONA UPDATECoronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, तर कोरोनामुक्त रुग्णांची...

Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५६ हजार पार

Subscribe

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असतानाच कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंतेत भर घातली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. तर कोरोना मृतांचा आकडाही १ हजारांपेक्षा कमी झाला आहे. गेल्या १०२ दिवसानंतर आज देशात ४०,००० हून कमी कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काहीसा दिसाला मिळत आहे. विशेष म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५६ हजार वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी रेट हा ९६. ८७ टक्क्यांवर पोहचला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात ३७ हजार ५६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९०७ कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत. तर ५६ हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परते आहेत. देशात आत्तापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हा ३ कोटी ३ लाख १६ हजार ८९७ वर पोहचला आहे. तर मृतांची एकूण संख्या ३ लाख ९७ हजार ६३७ झाली आहे. देशात आजपर्यंत २ कोटी ९३ लाख ६६ हजार ६०१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात सध्या ५ लाख ५२ हजार ६५९ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालय किंवा घरीच उपचार सुरु आहेत. तसेच देशात आत्तपर्यंत ४० कोटी ८१ लाख ३९ हजार २८७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील १७ लाख ६८ हजार ००८ चाचण्या गेल्या २४ तासांत झाल्याचे आयसीएमआरने सांगितले.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -