घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

Live Update: मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर

Subscribe

मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ वरुन ९५ टक्क्यावर आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ८३१ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ८६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा ) 

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले.मंगळवारी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर  ४७७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. (सविस्तर वाचा ) 


CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द, पंतप्रधानाच्या बैठकीतला मोठा निर्णय

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली


आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गात वाढ झालेली नाही. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही. त्यामुळे राज्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गात वाढ झालेली नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.


Ambani Scorpio Scare : पोलीस निरीक्षक सुनील माने पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आली आहे. मुकेश अंबानी Scorpio प्रकरणात सचिन वाजे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे आणि आता सुनील माने याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे.


बारावीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. परीक्षांबाबत शक्य असलेल्या सर्व पर्य्यांची चाचपणी यावेळेस करण्यात येणार आहे.


अभिनेता करण मेहराला पोलिसांनी जामीन दिला


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा ते अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षण, आरक्षणातील पदोन्नतीचा मुद्दा या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.


लॉकडाऊन शिथिल झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आली आहेत. आज मुलुंड ईस्ट टोल नाकावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.


आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात ३१ मेपर्यंत ३४ कोटी ६७ लाख ९२ हजार २५७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १९ लाख २५ हजार ३७४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.


गेल्या २४ तासांत देशात १ लाख २७ हजार ५१० नव्या रुग्णांची वाढ झाली असून २ हजार ७९५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ लाख ५५ हजार २८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा


सेन्सेक्स उघड होताच ७८ अंकांची वाढ, सध्या ५२,०१६.३५वर तर निफ्टी १५,६२९.६५वर


टीव्ही अभिनेता करण मेहराला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार पत्नीसोबत भांडण आणि मारहाण केल्याने गोरेगाव पोलिसांनी काल रात्री करणवर कारवाई केली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.


केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल बारावीच्या परीक्षेसंदर्भात घोषणा करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


दहावीच्या परीक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा असल्यामुळे सध्या काळात दहावीच्या परीक्षा घेणे शक्य नाही, असं प्रतिज्ञापत्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केलं आहे. बारावीच्या परीक्षेची तुलना दहावीच्या परीक्षेसोबत होऊ शकत नाही. केंद्राच्या निर्णयानंतर बारावीच्या परीक्षेबाबत ठरवू अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. ३५ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी १४ लाख ५५ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३५ लाख ६४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ३७ लाख ३० हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -