घरताज्या घडामोडीकोरोना संकटात सायकल विक्री जोरात; जाणून घ्या या मागचे कारण

कोरोना संकटात सायकल विक्री जोरात; जाणून घ्या या मागचे कारण

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत. पण, सायकल विक्रीचा उद्योग तेजीत असल्याचे समोर आले आहे.

जगात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, याचा फटका अनेक उद्योगांना बसला आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत. पण, सायकल विक्रीचा उद्योग तेजीत आहे. संपूर्ण जगात सायकलची जोरदार विक्री सुरु असून यामध्ये अमेरिका आणि भारत देशाचा देखील समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेत दरवर्षी दीड ते दोन कोटी सायकलची विक्री होते. पण, यावर्षी सहा महिने संपण्याआधीच अनेक मोठ्या दुकानदारांकडचा सायकलचा स्टॉक संपला आहे. वॉलमार्ट, टार्गेट या मोठ्या दुकानदारांनी वर्षभराची सायकल विक्री अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केली. हीच परिस्थिती युरोपमध्येही दिसत आहे. आशिया खंडातही अनेक ठिकाणी सायकल विक्रीत वाढ झाली आहे.

यासाठी खरेदी केली जाते सायकल

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच व्यक्ती घरात आहेत. तर काही प्रमाणात नियम शिथिल केल्यामुळे अनेक जण कामावर देखील जात आहेत. मात्र, कामावर जाण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तर अनेक जण सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे अनेकांनी सायकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक जण सध्या सायकलची खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. सकस आहार आणि पुरेशा व्यावसायामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे अनेक डॉक्टर सांगत आहेत. याच कारणामुळे व्यायामासाठीही देखील या सायकलचा वापर केला जात आहे. तर काही जण हाताला काम नसल्यामुळे गावी जाण्यासाठी सायकल खरेदी करुन शेकडो किलोमीटरचा प्रवास करत आहेत.

- Advertisement -

विक्रीमध्ये सायकलने गाठला उच्चांक

अमेरिकेत गेल्या तीन महिन्यांपासून सायकलची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. यासोबतच सायकल, हँड सॅनिटाझर आणि टॉयलेट पेपरच्या विक्रीत अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. याआधी १९७० मध्ये तेलाचे संकट निर्माण झाले, त्यावेळी सायकलची विक्री वाढली होती. पण, यावर्षी तेलसंकटाच्या काळातील विक्रीचा उच्चांकही मागे पडला आहे. प्रसिद्ध असलेल्या दुकानांमध्ये सायकल खरेदीसाठी झुंबड उडाली होती. आधी टॉयलेट पेपर आणि हँड सॅनिटायझरसाठी झुंबड उडाली होती. तर आता सायकल खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे.

फॅमेली सायकलाही मोठी मागणी

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे टाळत सायकलने प्रवास करण्याचे ठरवले आहे. यामुळे कोणतीही व्यक्ती इतर व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही. त्यामुळे हा पर्याय निवडला आहे. तसेच अमेरिका आणि युरोपमध्ये फॅमेली सायकला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रियकराने प्रेमात दिला धोका; प्रेयसीचे विमानात भंयकर कृत्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -