घरताज्या घडामोडीप्रियकराने प्रेमात दिला धोका; प्रेयसीचे विमानात भंयकर कृत्य

प्रियकराने प्रेमात दिला धोका; प्रेयसीचे विमानात भंयकर कृत्य

Subscribe

चीनमध्ये एका तरूणीचे प्रेम प्रकरणात हृदय तुटल्याने तिने विमानात एक भंयकर कृत्य केले. यामुळे सर्वच प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. तसेच प्रेमभंग झाल्यास ती व्यक्ती कोणतेही टोकाचे पाऊल देखील उचलते. अशीच एक घटना समोर आली आहे. चीनमध्ये एका तरूणीचे प्रेम प्रकरणात हृदय तुटल्याने तिने विमानात एक भंयकर कृत्य केले. यामुळे सर्वच प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

नेमके काय घडले?

द सनच्या वृत्तानुसार; एका तरुणीला तिच्या प्रियकरांनी प्रेमात धोका दिल्यामुळे तिने चक्क मद्यपान करुन विमानाची खिडकी तोडल्याची घटना घडली आहे. यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेमुळे इतर सहप्रवाशांना देखील त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही घटना गेल्या महिन्यात घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

लूंग एअर लाइन्सच्या माहितीनुसार; या तरुणीचे वय २९ वर्ष असून ली असे तिचे नाव आहे. ही तरुणी २५ मे रोजी विमानातून प्रवास करत होती. दरम्यान, ती तिच्या सीटवर बसून रडत होती. अचानक तिला राग आला आणि तिने विमानाच्या खिडकीवर हात मारला. त्या दरम्यान केबिनमधून क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत खिडकी तुटली होती.

हे विमान पूर्वी चीनच्या तटीय शहर यानचेंग येथून जिनिंगपर्यंत प्रवास करणार होते. मात्र, रस्त्यातच विमानाची खिडकी तुटल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. द गार्डियनच्या वृत्तानुसार; झेंग्झौ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमात तिला धोका दिल्याने तिने हे कृत्य केले असून या तरुणींने मद्यपान देखील केल्याचे समोर आले आहे. सध्या या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या तरुणीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – या कारणामुळे भारत – चीन सीमेवर होत नाही गोळीबार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -