घरताज्या घडामोडीCoronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थितीवर साधणार जनतेशी संवाद

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना परिस्थितीवर साधणार जनतेशी संवाद

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे देशातील आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:४५ वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधा नरेंद्र मोदी सातत्याने देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सर्व राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मोदींनी काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती या बैठकीत ११ प्रमुख कोरोनाप्रभावित राज्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोना परिस्थिती भयावह होत चालली असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


देशातील सर्वच राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. गुजरात, महाराष्ट्रासह ११ राज्यांती कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर,आयसीयू, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु रेमडेसिवीर आणि ऑक्सिज, व्हेंटिलेटरच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सूरू आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील वाढत्या कोरोना परिस्थितीवर काय वक्तव्य करणार तसेच देशात कोरोना रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करणार का अशी चिंता सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहे. पंतप्रधान मोदी आज मंगळवार संध्याकील ८.४५ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

राज्यात कडक लॉकडाऊन होणार 

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लॉकडाऊन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा बंदी लागू करायची किंवा कसे? याबाबत आज रात्री चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

- Advertisement -

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या मागणीला उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -