घरदेश-विदेशकोरोनाचा होतोय वेगानं फैलाव; मे महिन्याच्या ४ दिवसात ५०० लोकांचा कोरोनानं बळी

कोरोनाचा होतोय वेगानं फैलाव; मे महिन्याच्या ४ दिवसात ५०० लोकांचा कोरोनानं बळी

Subscribe

एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरस वेगाने पसरताना दिसतोय

एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरस वेगाने पसरताना दिसतोय. १ ते ५ मे दरम्यान १३ हजार १०६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या आजाराच्या रुग्णांची संख्या ४६ हजार ४३३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १२ हजार ७२७ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत १ हजार ५६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशामध्ये तब्बत ३ हजार ९०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून धक्कादायक बाब म्हणजे १९५ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूचा आकडा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे देशात आता ४६ हजार ४३३ कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या झाली आहे. त्यापैकी ३२ हजार १३४ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत १२ हजार ७२७ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १ हजार ५६८ लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.

- Advertisement -


CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३९०० नवे कोरोना रुग्ण; तर १९५ जणांचा मृत्यू

दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या ४ दिवसांची तुलना गेल्या एप्रिल महिन्यातील पहिल्या ४ दिवसांत एकूण २ हजार २०० नव्या प्रकरणांची नोंद केली गेली. यावरून असे लक्षात येते की गेल्या एका महिन्यात कोरोना व्हायरसची गती वाढली असून गेल्या ४ दिवसात साधारण ५०० लोकांचा कोरोनाने बळी गेल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रूग्ण

राज्यांच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १४ हजार ५४१ नवीन कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. गेल्या २४ तासांत येथे १ हजार ५६७ नवीन रूग्ण आढळले असून ३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असणाऱ्या गुजरातमध्ये ५ हजार ८०४ रूग्णांची नोंद झाली आहे तर गेल्या २४ तासात ३७६ नवीन रुग्ण आढळले असून २९ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -