घरCORONA UPDATECoronavirus vaccine: या महिन्यात मिळणार स्वदेशी लस 'कोव्हॅक्सिन'

Coronavirus vaccine: या महिन्यात मिळणार स्वदेशी लस ‘कोव्हॅक्सिन’

Subscribe

कोरोनाची दुसरी लाट येत असताना एक चांगली बातमी समोर येत आहे. भारतात कोरोनाची लस बनवण्याचा वेग वाढला आहे. सरकारी वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये देशाला ‘कोव्हॅक्सिन’ मिळू शकेल. ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. या लसीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे.

ही लस भारत बायोटेक आणि ICMR विकसित करत आहे. एका वरिष्ठ सरकारी शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, लसीच्या चाचण्यांचा अंतिम टप्पा या महिन्यापासून सुरू होईल. कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य आणि आयसीएमआर वैज्ञानिक रजनी कांत म्हणाले, आतापर्यंतच्या सर्व संशोधनातून ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीच्या किंवा मार्चच्या सुरूवातीस ही लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने चिंता वाढली

आतापर्यंत भारताच्या आशा ब्रिटनच्या अ‍ॅस्ट्रॅजेनेकावर होत्या, परंतु आता देशी लसीवर काम वेगाने सुरू आहे. ऑस्ट्रेलिया देखील लवकरच ही लस मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लसीचे १३.५ कोटी डोस तयार आहेत. युरोप आणि अमेरिकेत आलेल्या कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने सर्वांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी कोव्हॅक्सिन प्रभावी ठरू शकते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -