Covid-19 Reinfection : याआधी कोरोना झालाय ? पुन्हा संसर्गाचा धोका कायमच, तज्ज्ञांसमोरही पेच

India Coronavirus Update today 1270 new covid cases 31 death in last 24 hour
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

जगभरात कोरोनाच्या संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये रूग्ण आणि नातेवाईकांची वर्दळ पुन्हा वाढलेली आहे. त्यामध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या संसर्गामुळे ही रूग्णांची वाढ झपाट्याने झाली आहे. याआधीच्या कोरोनाच्या संसर्गाच्या तुलनेत पाचपटीने कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता ही ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे असल्याचा अहवाल इम्पेरिअल कॉलेज ऑफ लंडनने मांडला आहे. याआधीच्या डेल्टासारख्या व्हेरीएंटपेक्षाही अधिक वेगाने ओमिक्रॉन व्हेरीएंटचा संसर्ग हा पुन्हा होण्याचा अंदाज या अहवालात नमुद करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींना याआधीही कोरोनाची लागण होऊन गेली आहे, अशा व्यक्तींनाही कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे वाढली आहे, असे मत ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने मांडले आहे.

वैज्ञानिकांसमोर पेच काय ?

जगभरातील वैज्ञानिकांना अजुनही एक प्रश्न अनुत्तरीत आहे, तो म्हणजे एखादी व्यक्ती कोरोनाच्या संसर्गामुळे आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीला इम्युनिटी सिस्टिमच्या पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का ? इम्युनिटी सिस्टिम ही खरच भविष्यातही सुरक्षा देऊ शकते का ? हा जगभरातील वैज्ञानिकांसमोरील प्रश्न आहे. कोरोनाची लागण होऊ गेल्यानंतरही पुन्हा लागण होऊ शकते का ? या प्रश्नाचे उत्तर होय आहे. त्यासाठीचे कारणही ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनने देऊ केले आहे.

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती कोरोनाने बाधित होते, तेव्हा शरिरातील इम्युन सिस्टिम ही त्या व्यक्तीला व्हायरसविरोधात पुन्हा लढा देण्यासाठी मदत करते, असे ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनने स्पष्ट केले आहे. साधारपणे इम्युनिटी सिस्टीम ही कोरोनाच्या विषाणूविरोधात सरासरी तीन ते पाच महिने कार्यरत राहते. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचा धोका असतो.

जेव्हा एखाद्या नव्या व्हायरसचा संसर्ग होतो, तेव्हा आधीच्या इम्युन सिस्टिमचा प्रतिसाद हा कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी कमकुवत होतो. त्यामुळेच ज्यांना कोरोनाच्या व्हायरसची लागण याआधी झाली आहे, त्यांना नैसर्गिक अशा पद्धतीने व्हायरसची लागण पुन्हा होण्याचा धोका अधिक असतो. येल स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ आणि युनिवर्सिटी कॅरोलीन चार्लोट्ट येथे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार स्पष्ट केले आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतरची इम्युनिटी ही अल्पावधीसाठी तयार होते. त्यामुळेच ओमिक्रॉनसारख्या व्हायरसची लागण ही याआधी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला होण्याची शक्यता ही अधिक आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची लागण पुन्हा होण्याचा धोका हा अवघा १ टक्का असला तरीही कोरोनाची पुन्हा लागण झाल्याची आकडेवारी ट्रॅक करणे हे अधिक अवघड आहे, असे मत त्यांनी मांडले आहे.

कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्याल ?

तुम्ही कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घ्या. तसेच बुस्टर डोस शक्य असल्यास तोदेखील घ्या. तसेच बंदिस्त ठिकाणी मास्कचा वापर करा. तसेच वारंवार हात स्वच्छ आणि सॅनिटाईज करा. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तसेच लागण होण्याची शक्यता कमी होते. ज्या व्यक्तींना याआधीही कोरोनाची लागण झाली आहे, अशी व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे, याची खबरदारी घ्या. ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, अशा व्यक्तींसाठी लसीकरण पूर्ण झालेले असल्याचे निरीक्षण सीडीसीच्या अहवालातही मांडण्यात आले आहे.