घरCORONA UPDATEकोरोनाबाधितांना मोठा दिलासा, उपचार खर्च होणार आता 'टॅक्स फ्री'

कोरोनाबाधितांना मोठा दिलासा, उपचार खर्च होणार आता ‘टॅक्स फ्री’

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बऱ्याचं रुग्णांना आपला जीव गमवावा लागला तर कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णाला कंपनी किंवा एखाद्या व्यक्तीने उपचारांसाठी दिलेल्या रकमेवर आता कोणताही टॅक्स लागणार नाही. असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यास किंवा एखाद्या व्यक्तीस कोरोना उपचारांसाठी आर्थिक मदत पुरविली तर ती आर्थिक मदत कर्मचारी आणि लाभार्थीसाठी पूर्णपणे करमुक्त असणार आहे. तसेच कोरोना मृत्यूआधी झालेल्या हॉस्पीटलच्या खर्चावरही सरकार टॅक्स लावणार नाही. यासंदर्भातील घोषणा वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि हॉस्पीटलचा खर्च देण्यासाठी त्याच्या कुटुंबास कंपनीकडून मदत दिली गेली असेल तर ते आर्थिक मदत पूर्णपणे करमुक्त असेल. दोन्ही प्रकारचे फायदे आर्थिक वर्ष 2019-20 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये उपलब्ध असतील. कोरोना बाधित व्यक्तींना ही मदत देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात दुरुस्ती केली जाईल. असेही अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले. कंपनी व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीकडून कोरोना रुग्णाच्या उपचारांसाठी किंवा कोरोना मृत्यूच्या वेळी रुग्णाच्या कुटूंबाला आर्थिक मदत दिली तर ती आर्थिक मदतही करमुक्त असणार आहे. याची मर्यादा १० लाख निश्चित केली गेली आहे. दोन्ही प्रकारचे फायदे आर्थिक वर्ष 2019-20 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये उपलब्ध असतील.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -