घरताज्या घडामोडीvaccination-लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झालाय? मग पहील्या लसीचा प्रभाव कमी होणार...

vaccination-लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झालाय? मग पहील्या लसीचा प्रभाव कमी होणार का ? वाचा

Subscribe

गेल्या दिड वर्षांपासून संपू्र्ण जग कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. पण अद्यापही कोरोनावरील औषध शोधण्यात संशोधकांना यश मिळालेले नाही. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. यामुळे कोरोना लस घेण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. याचपार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लशीचे दोन डोस घ्यावे असे आवाहन सरकारतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. पण अद्यापही देशात असे अनेक नागरिक आहेत. ज्यांनी अद्यापपर्यंत एकही डोस घेतलेला नाही तर काहीजण दुसरा डोस घेण्यास चालढकल करत आहेत.

तज्त्रांच्या मते पहीला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस जर दिलेल्या वेळेत घेतला नाही तर पहील्या लसीचा प्रभाव टीकून राहत नाही. आज देशात मोठ्या संख्येने लसीकरण सुरू आहे. पण असे असले तरी आज अनेक राज्यांमध्ये नागरिकांनी पहीला डोस जरी घेतला असला तरी दुसरा डोस मात्र ठराविक वेळेत घेतलेला नाही. यामुळे पहील्या लशीचा प्रभाव फार काळ टीकणार नाही. अशा व्यक्तींना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते ठरलेल्या वेळेत दुसरी लस न घेतल्यास पहील्या लसीनंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती निष्क्रीय ठरेल. कोरोनाचा संसर्गही धोकादायक ठरू शकतो.

- Advertisement -

तसेच, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात दोन प्रकारच्या अँटीबाडीज तयार होतात. यातील एक ही कोरोनाचा संसर्ग झाल्यावर शरीरात तयार होते. तर दुसरी अँटीबॉडीज ही लसीच्या दोन डोसनंतर तयार होते. त्यातही लशीचे दोन्ही डोस घेतल्यांनतर ८० टक्के व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज तयार होते. यामुळे वेळेत दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -